माझा जन्म १९२० साली, कर्नाटक - महाराष्ट्र सीमाभागातील एका खेडॆगावात झाला. प्राथमिक शिक्षण ही तेथेच झाले. त्याच्या अनुषंगाने शेतातील काही किरकोळ कामे व घरची गुरे राखण्याचे कामही थोडया प्रमाणात मला करावे लागले. पुढे दुय्यम शिक्षणाचा प्रश्‍न आला. सुदैवाने माझे एक मामा कोल्हापुरला सरकारी अधिकारी होते. त्यांनी आपल्याकडे मला मी एम. ए. होईपर्यंत ठेऊन घेतले कोल्हापुरातील राजाराम हायस्कुलमध्ये माझे नाव दाखल केले. माझी शिक्षणात गती चांगली होती.शालान्त परीक्षा झाल्यावर मी प्रथम विज्ञान - शाखेत नाव घातले होते. परंतु तेथील प्रयोगाच तासांच्या वेळा व तेथून दूर असलेल्या आमच्या घरातील जेवणाच्या वेळा जुळेनात. म्हणून विज्ञानशाखा सोडून वाङ्‍मय शाखेकडे आलो. आमचे सर्वच प्राध्यापक चांगले होते. पुढे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरु झालेले डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कडक शिस्तीत आमीही वाढलो.
पुढे बी. ए. साठी तत्त्वज्ञान हा प्रमुख विषय घेतला. घरच्या माणसांना मी वकील व्हावे असे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञान विषय घेण्याला थोडा विरोध होता.घरच्या थोडया जमिनी होत्या. त्यानिमित्त कोर्टकज्जे नेहमी चालावयाचे त्यासाठी घरचाच वकील बरा असा सरळ साधा हिशोब पण मला तत्त्वज्ञान विषयाची मनापासून आवड होती. आजही आहे. शाळेत असताना स्वामी विवेकानंद व रामतीर्थ यांची बरीच पुस्तके माझ्या वाचनात आली होती. त्यामुळे ‘मी कोण?’ विश्वाच्या अस्तित्वात काही हेतू आहे काय ? अवकाशाचा अंत कोठे असेल ? जिला अन्त नाही अशी वस्तू असेल तरी कशी ? यासारखे प्रश्‍न मला आकर्षक आणि आव्हानात्मक वाटत.
प्रा. ना. सी. फडके हे आमचे तत्त्वज्ञानाचे मुख्य अध्यापक.त्यांच्या कीर्तीमुळे आकर्षित होऊन मी तत्त्वज्ञान विषयाकडे वळलो असा माझ्या मोठ‍या भावाचा कायम समज होता. पण ते बरोबर नव्हता. प्रा. फडक्यांची शिकवण्याची हातोटी अतुलनीय होती पण त्यांचे त्या विषयावर प्रेम नव्ह्ते. त्या विषयावरची नियतकालिके अथवा नवीन नवीन पुस्तके ते पहातही नसत. परंतु विद्यार्थीदेशात ते जे काही शिकले होते ते इतक्या रसाळपणे आम्हाला समजावून सांगत की तास सुटल्याची घंटा झाल्यावर आम्हास खरोखर वाईट वाटे. तत्त्वज्ञानाचे आमचे दुसरे प्राध्यापक प्रा. एम. ए. निकम. शहाजीराजांबरोबर ती मराठा घराणी बंगळूरास गेली. त्यांच्यापैकी एक निकमांचे.त्यामुळे त्यांना इकडील मराठी येत नसे. ते कॅंब्रिजचे पदवीधर होते व विषयाची त्यांना खरी आवड होती व ज्ञानही अद्यावत असे.पण कॅंब्रिजच्या इंग्रजीतील त्यांची व्याख्याने बहुतेक मुलांच्या डोक्यावरुन जात.त्यातल्या त्यात मलाच त्यांचे बोलणे थोडे समजते अशी मुलांची समजूत होती.
कॉलेजमध्ये मित्र असे मला कमीच होते. पण शत्रूही फारसे नसावेत. मित्रांत दोन नावे चटकन लक्षात येतात. एक रमेश मंत्री. साहित्यिक म्हणून त्यांनी चांगले नाव मिळवले.कोल्हापूर येथे झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आणि दुसरे बापूसाहेब पाटील. स्वातंत्र्य लढयात त्यांनी खूप काम केले व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सामाजिक स्वातंत्र्य व समता याकरताही अखेरपर्यंत त्यांनी झुंज दिली. आपल्या मराठी तत्त्वज्ञान परिषदेचे ते संस्थापक सदस्य होते. कॉलेजमधील माझे दिवस एकूण आनंदाचे गेले. वत्त्कृत्वाच्या चढाओढीत मधून मधून यश मिळावयाचे.त्यामुळे कॉलेज मार्फत मला म्हैसूर, मुंबई वगैरे ठिकाणी जावयाला मिळाले.ते दिवस अतिशय आनंदाचे होते असे मला वाटते.शिवाय, वर्गात गोंधळ करणे, मुलींना त्रास देणे वगैरे विद्यार्थ्यांची कर्तव्ये मी इमानेइतबारे पार पाडीत होतोच.
बी.ए.ची परीक्षा मी १ ल्या वर्गात पास झालो. तेव्हा प्राचार्य बॅ.खर्डेकर यांनी मला १॥-२ वर्षांकरिता व्याख्याता म्हणून नेमणूक दिली. आमचे प्रा. निकम दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्यामुळे ही जागा रिकामी होती. पाठोपाठ मी एम. ए. च्या परीक्षेत तत्त्वज्ञान विषयात १ ला आलो व तत्त्वज्ञान विषयाचे तेलंग सुवर्ण पदक मिळाले. त्यामुळॆ लगेचच १९४५ साली सावंतवाडी चे राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये व १९४६ ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम करावयास मिळाले.फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रा. रा. ना. दांडेकर, प्रा. रा. श्री. जोग, प्रा. ग. प्र. प्रधान
अशासारख्या विव्दज्जनांचा सहवास मिळाला. पत्‍नीचीही गाठ तेथेच पडली. बाई जेटबाई वाडिया लायब्ररीचा समृध्द ग्रंथ संग्रह हाताळण्यास मिळाला. अशा आनंदात दिवस जात असतानाच मुंबई सरकार चालवित असलेल्या धारवाड येथील कर्नाटक कॉलेजमध्ये माझी नेमणूक झाली. तेथे ३। वर्षे काम करुन मी राजाराम कॉलेजमध्ये आलो व येथूनच १९७८ अखेर निवृत्त झालो. ते माझेच कॉलेज असल्यामुळे कॉलेजमधील तत्त्वज्ञान विषयाची परंपरा चालविण्याचा यथाशक्ति प्रयत्‍न केला. त्यातूनच भारतीय तत्त्वज्ञान, नीतिमीमांसा ही पुस्तके माझ्या हातून लिहून झाली. दोन्ही पुस्तकांना त्या त्या वर्षाची सरकारी व बिनसरकारी अशी पारितोषिके मिळाली. ती वाचकांच्या पसंतीस उतरली हीच माझी कमाई.

महराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनानिमित्ताने तत्त्वज्ञानाचे ज्येष्ट अभ्याक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना भेटावे,तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या संर्दभात त्यांचे विचार जाणून घ्यावेत या उद्देशाने मनाशी काही प्रश्‍न योजून त्यांच्या फलटण येथील ‘श्री अरविंद ’
बंगल्याच्या पायर्‍या चढू लागलो.
आज काळ बदलत आहे. चंगळवादी प्रवृती वर समाज अधिकाधिक भर देऊ लागला आहे. माहिती तंत्रज्ञानावर भर देणारा हा काळ आहे. हा धागा पकडून त्यांना प्रश्‍न विचारता झालो- ‘आजच्या बदल्यात्या काळात तत्त्वज्ञानाचे महत्त्व काय ? भवितव्य काय आहे ?’
प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले, ‘तत्त्वज्ञान हा जीवनविषयीचा व्यापक विचार आहे. आजच्या बदलत्या काळात तत्त्वज्ञानाचे महत्त्व काय याबद्दल (C. E. M. Joad ) यांनी आपला (Philosophical Aspects o f Modern Times ) या ग्रंथात छान विवेचन केलेले आहे. पाश्चात्य जगतात तत्त्वज्ञानाकडे आपल्यापेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. ‘जीवनाची योग्य समज यावी’ हा तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचा उद्देश आहे. तत्त्वज्ञ समाजात नेहमीच संख्येने कमी असतात पण ते समाज जीवनात समतोल निर्माण करीत असतात. स्वामी विवेकानंद, म. गांधी, रविंद्रनाथ टागोर यांचे विचार आजही चिंतनीय स्वरुपाचे आहेत.
तत्त्वज्ञानाच्या भवितव्याबाबत म्हणाले, जगाला तत्त्वज्ञानाची गरज नेहमीच भासत राहणार ! तत्त्वचिंतनाची परंपरा कधीच थांबणार नाही. तत्त्वज्ञान म्हणजे जीवनाला समजून घेणे होय. हे समजून घेणे कधीच संपणार नाही.
प्राचार्य भोसले सरांना विचारले आपण तत्त्वज्ञानाचा अभ्यास कसा केलात ? यावर ते उत्तरले - आमचा काळ वेगळाच होता. स्वातंत्र्यचळवळीने ढवळून निघालेला तो काळ होता. मी काही दिवस म. गांधीच्या प्रार्थनेला जात होतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण‍न् यांची सलग १२ व्याख्याने ऎकली. टागोरांना प्रत्यक्ष पाहिले नाही पण त्यांची ‘गीतांजली’ अभ्यासली. त्यातील ३६ वे गीत ‘जीवनभाष्य’ हे जग कसे असावे याचे वर्णन करते. याबरोबरच तत्त्वज्ञानाच्या विविध ग्रंथाचा मी अभ्यास करीत गेलो.
आजच्या तत्त्वज्ञानाच्या तरुण अभ्यासकांनी तत्त्वज्ञानाचा मराठी भाषेतून कितपत अभ्यास करता येईल ? या प्रश्‍नांना उत्तरे देताना ते म्हणाले - आजच्या तरुणांनी तत्त्वज्ञानातील मुलभूत समस्या समजावून घेण्यासाठी रसेलचा (Problems of Philosopy ) हा ग्रंथ अभ्यासला पाहिजे. तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक अभ्यासासाठी मराठी भाषेतील ग्रंथ उपयुक्त ठरतील त्यामध्ये दि.म. देशपांडे , मे. पु. रेगे, श्रीनिवास दिक्षित यांचे ग्रंथ आर्दश आहेत. ते अभ्यासावेत. पण इंग्रजीची जागा मराठी भाषा घेऊ शकणार नाही कारण ‘इंग्रजी’ ही अधिक व्यापक अशी भाषा आहे. इंग्रजी ग्रंथाचे वाचन आवश्‍यक आहे.
तरुणांनानी अभ्यासाला वाहून घेतले पाहिजे. त्यासाठी वेळ, विचार, आस्था यांची गरज आहे. मराठीची श्रीमंती वाढावी पण त्यापेक्षा विचारांची
श्रीमंती मराठी भाषेला प्राप्त व्हावी यासाठी तत्त्वज्ञानपर अधिकाधिक ग्रंथ मराठीतून प्रकाशित व्हावेत पण इंग्रजी भाषेचा वापर अटळ आहे.
आपण तरुणांना काय मा‍र्गदर्शन कराल ? या शेवटच्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘तरुणांनी वृत्तीने अभ्याक व्हावे’, अभ्यास हेच मुल्य बनावे. तरुणांना नेमके काय करावयाचे आहे ते कळले पाहिजे त्यासाठी आंतरिक ओढ पाहिजे, चिंतनाची गरज आहे. त्यासाठी आजच्या युगात उपल्बध असलेली टी. व्ही. वरील विविध चॅनेल्स, मोबाईल फोन, फास्टफुड अशा साधनांपासून जाणीवपूर्वक दूर राहिले पाहिजे. तरच काहीतरी साध्य करता येईल.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या अल्पशा भेटीत प्राप्त झालेले अमोल विचारधन गांठीशी बालगून समाधानाने त्यांच्या बंगल्याच्या पायर्‍या उतरता झालो.

'' Biology is not enough to give an answer to give an answer to the question that is before us : why is woman the Other ?" Simone de Beauvoir

Feminist activism protests against a society that discriminates against women. Yet, despite conferring women with greater opporunity ,such activism has not succeeded in translating gender equality to a full blown material reality. Consequently, feminist philosophers have turned to theory to articulate their social protes. The latter takes the from of contesting patriarchal elements in
Philosophical Concepts that are taken for granted by the academy. The burgeoning volumes of feminist philosophy tesify to this bond between theory and practice.

This paper is an attempt to investigate the direction of the relation between social protest in feminist activism and the intellectual
protest in feminist philosophy. It does so by examining the feminist trans formation of the mind / body debate by gesture that forgrounds
embodiment. Rather than dissolve this relation, feminists address a new and conentious question about the relation between sex and gender. This paper explores the fate of this question, as well as, its relevance for social transformation.

This paper is divided into there parts. It begins by locating feminist intervention in philosophy on the canvas of activist social protest and proceeds to examine the feminist critique of perspectives that privilege the mind. The second part of the paper will evaluate key arguments made by feminists who enter into the sex / gender debate, rather than that of the mind and the body. Their moot issue is whether sex should be given up as a biological entity and replaced by gender. In its final part, this paper will dwell on the interpretation of embodiment from a feminist perspective. Some questions include : Is embodiment the same as biological sex ? What is collective embodiment ? These questions are significant for a philosophy of social protest that is led by embodied genderd human beings.

Philosophy of Rebellion :An Ideological Perspective of Anticaste Struggle
Anand Teltumbde

Rebellion in simple terms is not submitting to the established power in any realm including intellectual. Albert Camus defined a reblel
as one who says NO. Descartes, who doubted established philosophical thought, Nietszche, who decided to kill God to let men free, Sartre,who said that we decide our destiny and define ourselves, or Jonics,who would not accept any more the mythic explanations of the world, were rebels. So were Charvaka and Buddha, who discarded vedic tradition and preached new dhamma, Jotiba Phule,who defied
brahmanic dictum and started schools for girls and untouchables and Ambedkar, who renounced Hindu religion itself and embraced Buddhism, rebels. Rebels usually have opinions that stray far from the majority's beliefs making them somewhat philosophrs. Every rebellion essentially begins in the realm of thought. In that sense any philosophy is basically a rebellion because it is the rejection of what is considered correct by a majority. Philosophy at its core is the rejection of popular belife. Karl Marx (1845) had famously said in his Theses on Feuerbach (Thesis X I ), "The philosophers have only interpreted the world,in various ways : the point is to change it. "in connotation it means that the thought oriented to bring about change in society is philosophy. The 'No' to the status quo is essentially embedded in such a thought.

In India, more than any where else, the struggle against the establishment expressed itself predominantly in philosophical terms. The rebellion of Shramans againts the establishment of Brahmans for the most part of history has been its characteristic feature.Indian materialists like Charvaka with their lokayat philosophy ; the Jains and Budhists were among the numerous rebels of the Shraman stream against the hierarchical ideology and other irrationalities of the Brahmans. In medieval times, Bhakti movement represented its legacy articulating a muted rebellion. As western liberal ethos, modern education, rationalism, rule of law, and so on represented these resources, the bourgeois revolutions in Europe and America at advent of Marxism and Leninism that brought about proletarian revolution in Russia, proved inspirational beacons to innate rebellion. It manifested into various movements of masses.The anti - Brahmin movement of the lower castes under the ledership of Jotiba Phule, Periyar and others and the anti - caste movement under Dr. Ambedkar has been a predomiant part of them. After independence, the legacy of these rebellions remained subdued by the new assimilative institutional framework for some time. However, it could not contain the rebellious prowess of masses. The rebellion erupted in many forms such as dalit panthers, naxalism, women's movement and so on.

This paper seeks to capture the essential philosophical tenets of rebellion through history of the last two millennia. Caste being the characteristic feature of the Indian social system, it tries to mark the intersection of these philosophies with the basic concerns of casteism. Maintaining its focus on the caste system,it examines philosophical equipment of the bhakti movement for its rebellion against the caste system. There has been a marked shift in philosophy of rebellion during the colonial times. The paper tries to Ambedkar and furher to the Dalit Panthers during the post - independence times. While examining the objective failure of all these rebellions in annihilating the caste system, the paper examines the character of castes and other environmental parameters today and suggests a philosophical shift that is necessary in order to successfully annihilate them.

पुणे ता. २५ : तत्त्वज्ञान हे केवळ पुस्तकात न ठेवता सामान्य माणसांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आज येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या पंधराव्या अधिवेशनाचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर अध्यक्षस्थानी होते. रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात हे अधिवेशन भरले आहे.

तत्त्वज्ञान हे पुस्तकी असून चालणार नाही; त्याचा आणि सामान्य माणूस यांचा मेळ घालणे गरजेचे आहे. असे न्या. धर्माधिकारी यांनी नमूद केले. ते म्हणाले, "कोणतेही विचार हे व्यक्तिनिपेक्ष असतात. ते जेव्हा एखाद्या व्यक्तिच्या नावावर आणि विशिष्ट धर्म किंवा संप्रदायाच्या नावावर मांडले जातात, तेव्हा त्यांना तत्त्वज्ञानाचे स्वरुप येते. मग मुळात प्रवाही असणारे विचार स्थिर बनतात. त्यातून पारलौकिकता वाढते व
परस्पारिकता कमी होते. अमुक एक तत्त्वज्ञान कळले किंवा नाही यावरच विद्वानांत चर्चा होऊ लागते आणि मूळ तत्त्वज्ञान या संघर्षात हरवले जाते असे होऊ न देता तत्त्वज्ञानाचा जीवनाशी संबंध लावला पाहिजे.

तत्त्वज्ञाच्या गोष्टी सांगून सामान्यांच्या तात्त्विक भूमिकेलाच शह देण्याचा प्रकार हल्ली होत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, "समाजाची मूल्ये बदलत आहेत. कायदा मोडणारेच प्रतिष्ठित बनत आहेत. पैसा, दंडेलशाही आणि माफिया यांनाच महत्त्व आले आहे. अशांमध्ये सामान्यांची कुचंबणा होत आहे. भारत हा पहिल्यापासून संपन्न देश आहे. मात्र येथील विशिष्ट लोकांनीच त्याचा उपयोग घेतला आणि घेत आहेत. अशा स्थितीत समता प्रस्थापित करण्यासाठी तत्त्वज्ञानाचा उपयोग करुन घेतला पाहिजे. प्रस्थापितांना बदल नको असतो आणि सार्वत्रिकीकरणही नको असते. त्यांच्या वृत्तीत बदल करायला हवा."

डॉ. निगवेकर म्हणाले, "तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषा आदी मानव्यशास्त्रातील विषय अलीकडच्या काळात काहीसे बाजूला पडले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. वास्तिवक हे विषयच समाजाला बळकटी देत असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवाची आणि समाजाची भौतिक प्रगती होते; पण मानवी अंतरंग समृद्ध करण्याचे काम मानवशास्त्र करीत असते. त्यामुळे या विषयांचे महत्त्व जानून घेणे गरजेचे आहे. तत्त्वज्ञानासारखा विषय सामान्यजनांपर्यंत पोचायला हवा. त्यासाठी या विषयाची मराठीतीतल पुस्तके उपल्बध व्हायला हवीत. पुणे विद्यापीठ आणि मराठी तत्त्वज्ञान परिषद यांनी या कामी एकत्र येऊन उपक्रम सुरु करावा."

कार्यध्यक्ष बी. आर. दोशी यांनी अहवालाचे वाचन केले. अध्यक्ष डॉ. शि. श. अंतरकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल तुपे यांनी आभार मानले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. मे. पुं. रेगे; तसेच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी अधिवेशनास उपस्थित आहेत. दुपारच्या सत्रात समतेची संकल्पना आणि विषमतेची समस्या या विषयावर परिसंवाद झाला.

म. त. प. २२ वे अधिवेशन, लातूर तत्त्वज्ञानाला हवा विज्ञानाचा आधार - तत्त्वज्ञान परिषदेच्या अधिवेशनात डॉ.
सदानंद मोरे यांचे मत

लातूर दि. ७ (प्रतिनिधी) : बदलत्या काळात तत्त्वज्ञानाचे निकषही बदलत चालले आहेत; परंतु विज्ञानाच्या आधारावरच तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. सदानंद मोरे यांनी केल.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे २२ वे अधिवेशन लातुरातील दयानंद कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी
अधिवेशनाचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा नगराध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे उपस्थित होते. व्यासपीठावर महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्री.व्यं. बोकील, सहअध्यक्ष डॉ. ज. रा. दाभोळे, कार्याध्यक्षा प्रा. गौरी भागवत, प्राचार्य डॉ. विभांकर मिरजकर, उपप्राचार्य वामन पाटील, प्रदीप शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मोरे म्हणाले की, सॉक्रेटिस हा पहिला तत्त्ववेता. तत्त्वज्ञानाची सुरुवात पाश्‍चिमात्य देशात झाली असली तरी भारतावर इंग्रजांचे राज्य असल्यामुळे इंग्रजी भाषेच्या माध्यमातून आपल्या देशात तत्त्वज्ञान झपाटयाने आले. एखाद्या विषयाच्या मुळावर जाऊन सखोल चर्चा करुन सत्याच्या आधारावर तत्त्वज्ञानाची निर्मिती होऊ लागली. सध्या आपल्या शिक्षण पद्धतीवर पाश्‍चिमात्य शिक्षणाचा पगडा आहे. डॉक्टरेट मिळविणार्‍यांनी संबंधित विषयाचे सखोल विश्‍लेषण करुन मांडणी केली पाहिजे. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या माध्यमातून तत्त्वज्ञान खालच्या तळापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्‍न होत असून ही परिषद सर्वदृष्टया सक्षम झाली पाहिजे असेही डॉ. मोरे यांनी सांगितले .

नगराध्यक्ष डॉ. जे. एम. वाघमारे तत्वज्ञानाविषयी विश्‍लेषण करताना म्हणाले, कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाऊन चिंतन करणे म्हणजे तत्त्वज्ञान. सत्याच्या आधारावर हे तत्त्वज्ञान मांडले पाहिजे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा लातूर जिल्ह्यात तत्त्वज्ञानाची परिस्थिती चांगली आहे. लातूर यापूर्वीही शिक्षणाचे माहेतघर होते आणि आताही आहे. सध्या लातूर शहरात १२०० विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करीत आहेत. लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रथम पाली भाषेचा अभ्यास शिकविण्यात सुरुवात झाली. संस्कृत, पाली, तत्त्वज्ञान हे सर्व विषय समाज परिर्वतनासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष होता कामा नये. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल या तत्त्ववेत्त्यांनी आपापल्या तत्त्वानुसार तत्त्वज्ञानाची मांडणी केली. लोकशाही कल्याणकारी राज्याची संकल्पना असून, कोणत्याही विषयाचे तत्त्वज्ञान मांडत असताना सत्याची नस पकडता आली पाहिजे. हे करीत असताना समाज विकासाची नाळ तुटू नये असेही डॉ. वाघमारे म्हणाले. डॉ. बोकील, डॉ, दाभोळे यानीही यावेळी तत्त्वज्ञानाविषयी विश्‍लेषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य वामन पाटील यांनी केले. प्रा. डॉ. नागोराव कुंभार, डॉ. रणसुभे, प्राचार्य मिरजकर, प्रा. काळे, प्रा. शर्मिला वीरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोयंका’ पुरस्काराचे वितरण यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. पहिला पुरस्कार डॉ. सूर्यनारायण रणसुभे, तर तिसरा पुरस्कार डॉ. जे. एम. वाघमारे यांना देण्यात आला. गौरी भागवत यांनी आढावा घेतला. प्रदीप शहा यांनी संदेशवाचन केले. यावेळी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. पी. गायकवाड, प्रा. सुनील साळुंके, प्रा. सुभाष भिंगे, प्रा. जोगेंद्रसिंह विसेन, प्रा. जाधव आदींच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. शिवाजी जवळगेकर यांनी केले.

लातूर दि. ७ (बातमीदार) : तत्त्वज्ञान हा सर्व ज्ञानशाखांचा आरसा आहे. पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञान हे रोजच्या जगण्यातून तयार झाल्याने त्यात नवनिर्मिती झाल्याचे दिसून येते. आपल्याकडेही तत्त्वज्ञान हा जगण्याचा विषय झाला, तरच त्याचे भवितव्य चांगले असेल, असे मत पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

येथील दयानंद कला महाविद्यालयात महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या दोन दिवसांच्या २२ व्या अधिवेशनाला सोमवारी (ता. सात) सुरुवात झाली. याचे उद्‍घाटन मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे होते. डॉ. ज. रा. दाभोळे, श्रीमती गौरी भागवत, प्रदीप शहा, प्राचार्य विभाकर मिरजकर, उपप्राचार्य वामन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, "भारतीय व पाश्‍चात्त्य परंपरेमुळे आपण समृद्ध झालो आहोत, हे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणार्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे."

बडोद्याचे महाराजे सयाजीराव गायकवाड यांनी युरोपातील चांगले ग्रंथ मराठीत करण्याचा प्रयत्‍न केला. नीतिशास्त्राचे ग्रंथ त्यांनी आणले. त्याचा फायदा मराठी भाषिक तत्त्ववेत्यांना घेता आला नाही. शाहू महाराजांचे सामाजिक बदल उचलले गेले, तेवढे सयाजीरावांचे मराठी भाषा समृद्ध करण्याचे प्रयत्‍न उचलले गेले नाहीत. तत्त्ववेत्याला रोजचे प्रश्‍न भेडसावले पाहिजेत, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

डॉ. वाघमारे म्हणाले, "आपल्याकडे धर्म व तत्वज्ञान समांतर चालले आहे. धर्मातून तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्‍न झाला. दोन्ही गोष्टी एकच आहेत, असे आपण समजत गेलो. पाश्‍चिमात्य तत्त्वज्ञान धर्मनिरपेक्षतेवर तयार झालेले आहे. ज्ञान, सत्य व न्याय ही तत्त्वज्ञानाची त्रिमिती आहे."

डॉ. बोकील म्हणाले, "सर्व विषयांत तत्त्वज्ञान आहे. तर्कशास्त्र सर्व विद्याशाखांत सक्तीचा विषय केला पाहिजे." डॉ. दाभोळे म्हणाले, "तत्त्वज्ञान लोकांपर्यंत जावे हा उद्देश ठेवून परिषद काम करीत आहे." यावेळी डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. वाघमारे यांना उत्कृष्ट ग्रंथाचा तर डॉ. कमलजित कौर यांना निबंधाबद्दल पुरस्कार देण्यात आला. यावेळी श्री. मिरजकर, श्री शहा यांची भाषणे झाली. वामन पाटील यांनी प्रास्ताविक, तर शिवाजी जवळगेकर यांनी सूत्रसंचालन केले.

म. त. प. २२ वे अधिवेशन, लातूर तत्त्वज्ञान अन्य शाखांचा आरसा - प्रा. सदानंद मोरे

तत्त्वज्ञानात तर्काला महत्त्व असेल, तरी बुद्धीला विवेकाची जोड असणे आवश्यक आहे."
लातूर शहर राष्ट्रकुलाच्या काळात राजधानी होती व त्याही काळी ते विद्येचे माहेरघर होते. हीच परंपरा ६०० वर्षानंतर टिकून असल्याचा उल्लेख श्री. वाघमारे यांनी केला. लातुरामध्ये १ हजार २०० विद्यार्थी तत्त्वज्ञानाचे, १ हजार ५०० विद्यार्थी संस्कृतचे आणि ३०० विद्यार्थी पाली भाषेचे शिक्षण घेत असल्याचा उल्लेक त्यांनी केला.

तत्त्वज्ञान परिषदेतर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी देण्यात आलेला गोएंका प्रथम पुरस्कार डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांच्या ‘मी, तुम्ही, धर्म आणि सत्ता’ या पुस्तकाला देण्यात आला. डॉ. शरद पाटील (धुळे) यांच्या पुस्तकास द्वितीय व डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या पुस्तकास तृतीय पुरस्कार देण्यात आला. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. श्री. व्यं. बोकील यांनी तर्कशास्त्र हा विषय सर्व शाखांसाठी सक्तीचा केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. सामान्य माणसांपर्यंत तत्त्वज्ञान पोहोचण्यासाठी मराठीतून लिखाण होण्याची गरज डॉ. ज. रा. दाभोळे यांनी व्यक्त केली. प्रा. गौरी भागवत यांनी अहवालवाचन केले. प्रा. शिवाजी जवळगेकर यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. डॉ. नागोराव कुंभार, डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांचीही भाषणे झाली.

म. त. प. २२ वे अधिवेशन, लातूर तत्त्वज्ञानाला हवा विज्ञानाचा आधार : डॉ. सदानंद मोरे (लोकमत - ८/११/२००५)

लातूर दि. ७, बदलत्या काळात तत्त्वज्ञानाचे निकषही बदलत चालले आहेत. परंतु विज्ञानाच्या आधारावरच तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे २२ वे अधिवेशन लातुरातील दयानंद कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. आज सकाळी अधिवेशनाचे उद्‍घाटन झाले. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु व नगराध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे उपस्थित होते. व्यासपीठावर महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्री. व्यं. बोकील, सहअध्यक्ष डॉ. ज. रा. दाभोळे, कार्याध्यक्ष प्रा. गौरी भागवत, प्राचार्य डॉ. विभाकर मिरजकर, उपप्राचार्य वामन पाटील, प्रदीप शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्ष डॉ. जे. एम. वाघमारे तत्त्वज्ञाविषयी विश्‍लेषण करताना म्हणाले, कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाऊन चिंतन करणे म्हणजे तत्त्वज्ञान, सत्याच्या आधारावर हे तत्त्वज्ञान मांडले पाहिजे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा लातूर जिल्ह्यात तत्त्वज्ञानाची परिस्थिती चांगली आहे. लातूर यापूर्वीही शिक्षणाचे माहेरघर होते आणि आताही आहे. सध्या लातूर शहरात १२०० विद्यार्थी तत्त्वज्ञानाचा तर दीड हजार विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करीत आहेत. लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रथम पाली भाषेचा अभ्यास शिकविण्यास सुरुवात झाली. संस्कृत, पाली,
तत्त्वज्ञान हे सर्व विषय समाजपरिवर्तनासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष होता कामा नये. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल या तत्त्ववेत्त्यांनी तत्त्वज्ञानाची मांडणी केली. लोकशाही कल्याणकारी राज्याची संकल्पना असून कोणत्याही विषयाचे तत्त्वज्ञान मांडत असताना सत्याची नस पकडता आली पाहिजे. हे करीत असताना समाजविकासाची नाळ तुटू देऊ नये, असेही डॉ. वाघमारे म्हणाले.