महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेची स्थापना करण्यासाठी, प्रा.ज. रा. दाभोळे यांनी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील सर्व तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांची व तत्त्वज्ञानाची आस्था असणार्‍या व्यक्तींची नाव व पत्त्यासह यादी तयार केली. त्यांनी रविवार दिनांक २-११-१९८० रोजी कोल्हापूर येथे हिंदकन्या छात्रालयात सभेला उपस्थित राहण्याची निमंत्रणे पाठविली. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेची स्थापना करण्याची ही पहिली सभा होती.या सभेत तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते असे मिळून ३० प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेच्या पूर्वतयारीसाठी व घटनेचा मसुदा तयार करण्यात आली. या सुकाणू समितीची बैठक २८ डिंसेबर १९८० रोजी पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाली. या सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. श्री. ह. दीक्षित होते तर निमंत्रक प्रा. दाभोळे हे होते या बैठकीत परिषदेचे नाव ‘महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद’ असे ठरविण्यात आले. या सुकाणू समितीस पुढील मान्यवर उपस्थित होते.

१) डॉ. शि. स. अंतरकर - मुंबई
२) प्रा. श्रीनिवास दीक्षित - कोल्हापूर
३) डॉ. सु. वा. बखले - नागपूर
४) प्रा. ज. रा. दाभोळे - कोल्हापूर
५) डॉ. ज. ना. जोशी - पुणे
६) डॉ. एस. आर. कावळे - पुणे
७) प्रा. एस. एन. पाटील - कोल्हापूर
८) प्रा. प्रा. मे. पुं. रेगे - मुंबई
९) डॉ. आर. सुंदरराजन - पुणे

महाराष्ट्रात तत्त्वज्ञान परिषदेचा मसुदा तयार करण्यासाठी एक उपसमिती तयार करण्यात आली. या उपसमितीत डॉ. ज. वा. जोशी, डॉ.ग.ना. जोशी, डॉ. एस. आर. कावळे, प्रा. ज. रा. दाभोळे, व डॉ. शरद देशपांडे यांच्या नावांचा विचार झाला. सल्लागार म्हणून प्रा. दे. द. वाडकर व न्यायमूरर्ती श्री. वि. अ. नाईक यांची निवड झाली. या उपसमितीने यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे, असे ठरविण्यात आले. या उपसमितीने तयार केलेल्या मसुदद्याचा फेरविचार व सूचना ऑक्टोबर १९८२ मध्ये
नागपूर येथे होणार्‍या परिषदेच्या स्थापना सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेची रीतसर स्थापना व घटना मंजूर होईपर्यंत सर्व खर्च प्रा. ज. रा.
दाभोळे यांनी करावा असे ठरले. नंतर सुकाणू समितीच्या सर्व सदस्यांची व आजीव सदस्यांकडून आलेल्या वर्गणीचा सर्व हिशोब प्रा. दाभोळे यांनी सांभाळला.

महाराष्ट्रात तत्त्वज्ञान परिषदेचे स्थापना अधिवेशन दिनांक १० व ११ नोव्हेंबर १९८१ रोजी नागपूर येथे घेण्याचे निश्चित झाले. परंतु परिस्थितीजन्य अडचणीमुळे, हे अधिवेशन रद्द करुन पुणे येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात २० व २१ नोव्हेंबर १९८२ रोजी आयोजित केले गेले. हे अधिवेशन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सुसंपन्न झाले. या स्थापना अधिवेशनात तीन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद : नैतिक मूल्यांवरील भारतीय चिंतन.
सहभाग : १) प्रा. श्री. ह. दीक्षित - कोल्हापूर
२) प्रा. ना. शा. द्रविड - नागपूर
३) डॉ. शि. स. अंतरकर - गोवा
४) प्रा. रमाकांत सिनारी - मुंबई
५) प्रा. द. शा. जकाते - अमरावती

दुसरा परिसंवाद : सामाजिक न्याय
सहभाग : १) प्रा. मो. प्र. मराठे - पुणे
२) डॉ. ज. वा. जोशी - सांगली
३) प्रा. भा. ग. केतकर- धुळे

तिसरा परिसंवाद : स्वातंत्र्याची संकल्पना
या विषयावर संपन्न झाला, अशाप्रकारे महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे स्थापना अधिवेशन, घटनेची स्वीकृती व कार्यकारी मंडळाची निवड होऊन, हे अधिवेशन यशस्वीरीत्या संपन्न झाले. या अधिवेनातील परिसंवादात सादर केले गेलेले काही निबंध परार्श खंड ४, अंक ४, (फेब्रुवारी १९८३) या अंकात प्रसिध्द झाले.
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद : एक धावता आढावा

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे पहिले अधिवेशन दिनांक १ व २ में १९८४ रोजी कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवन व जैन बोर्डिंगमधील चतुरभाई सभागृहात संपन्न झाले. या अधिवेशनाचे कार्याध्यक्ष व निमंत्रक प्रा. ज. रा. दाभोळे होते. तर स्वागताध्यक्ष दलितमित्र बापूसाहेब पाटील हे होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या शुभहस्ते झाले. जैन बोर्डिंग परिसराला महर्षी वि. रा. शिंदे नगर असे नाव देण्यात आले. पुढील दोन विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

पहिला परिसंवाद : नवमार्क्सवाद
अध्यक्ष- श्री. शांताराम गरुड
सहभाग १) प्रा. मे. पुं. रेगे - मुंबई
२) डॉ. अशोक चौसाळकर - कोल्हापूर
३) डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे - नागपूर

दुसरा परिसंवाद : न्याय व सामाजिक समता
सहभाग १) डॉ. प्रदीप गोखले - पुणे
२) श्री. रा. ना. चव्हाण - वाई
३) प्रा. दि. मा. खैरकर - नागपूर
या पहिल्या अधिवेशनापासून सुरु झालेल्या व्यक्तिगत निबंध वाचनाची सत्रे पुढील सर्व अधिवेशनात यशस्वीरीत्या संपन्न झाली. निबंधवाचकांची उत्तरोत्तर संख्याही वाढत गेली.या अधिवेशनास सुमारे ५० प्रतिनिधी उपस्थित होते. म. त. प. च्या या अधिवेशनाची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली.हे अधिवेशन यशस्वीरीत्या व दिमाखदार स्वरुपात संपन्न झाले.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे दुसरे अधिवेशन दिनांक ५ व ६ नोव्हेंबर १९८५ रोजी नागपूर येथील कला व समाजविज्ञान संस्थेत संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव प्रा. प्र. ब. कुलकर्णी, तर स्थानिक स्वागताध्यक्ष कला व समाजविज्ञान संस्थेचे संचालक डॉ. भा. र. आष्टीकर हे होते.परिषदेचे अध्यक्ष डॉ. दि.य. देशपांडे उपस्थित होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. म. अ. चान्सरकर यांच्या शुभहस्ते झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे होते. ह्या अधिवेशनाचे आयोजन नागपूर युनिव्हर्सिटी फिलॉसॉफी टीचर्स असोसिएशनने (नुप्टा) केले होते. या अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - नव हिंदुत्ववाद
सहभाग १) प्रा. श्री. ह. दीक्षित - कोल्हापूर
२) डॉ. सुधाकर भालेराव - नागपूर
३) डॉ. कृष्णराव भागडीकर - नागपूर
४) प्रा. ह. च. धोंगे - नागपूर

दुसरा परिसंवाद - व्यक्तीची तदेवता
सहभाग १) डॉ. शि. स . अंतरकर - गोवा
२) डॉ. सु. वा. बखले - नागपूर
३) डॉ. श्री. व्यं. बोकील - पुणे
४) डॉ. भा. ग. केतकर - धुळे
५) डॉ. मो. प्र. मराठे - पुणे
या अधिवेशनातील परिसंवादात सादर केले गेलेले काही निबंध परामर्श खंड ८, अंक ३, (नोव्हेंबर १९८६) यात प्रसिध्द झाले. तसेच व्यक्तिगत निबंध वाचनाचे सत्र डॉ. वा. शि. बारलिंगे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थित पार पडले. म. त. चे अध्यक्ष प्रा. दि. य. देशपांडे, डॉ. सु. वा. बखले यांच्या संयोजनामुळे हे अधिवेशन एका वैचारिक उंचीवर जाऊन पोहचले.

म.त. प. चे ३ रे अधिवेधन दिनांक ६, ७ व ८ नोव्हेंबर १९८६ रोजी ठाणॆ जिल्ह्यातील बी. एन. एन. कॉलेज, भिवंडी येथे संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव प्रा. अशोक कोर्डे, तर स्वागताध्यकाक्ष मा. श्री. भाऊसाहेब धामणकर होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्राचार्य ग. ल. अभ्यंकर यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठ माजी तत्त्वज्ञान प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे होते.प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष मा. श्री. वि. स. पागे व प्रा. मे. पुं. रेगे होते. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे म. त. प. ची पहिली स्मरणिका "परिचय पुस्तिका" या नावाने प्रकशित झाली. या अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद संपन्न झाले.

पहिला परिसंवाद - धर्मनिरपेक्षता : भारतीय घटनेच्या संदर्भात
सहभाग १) डॉ. सा. गे. निगळ - भिवंडी
२) डॉ. ल. ग. चिंचोळकर - काटोल - नागपूर
३) प्रा. (डॉ.) ज. रा. दाभोळे - कोल्हापूर

दुसरा परिसंवाद - अर्थाची समस्या
सहभाग १) डॉ. बा. य. देशपांडे - अमरावती
२) डॉ. एस. आर. बोंगळे - मुंबई
३) डॉ. उषा गडकरी - नागपूर
याशिवाय व्यक्तिगत निबंधवाचनाची दोन सत्रे झाली. वरील दोन्ही परिसंवादातील आणि व्यक्तिगत निबंधांचा संग्रह ‘तत्त्वदर्पण’ या ग्रंथाच्या रुपाने प्रसिध्द झाला.
या महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्रा. डॉ. सा. गे. निगळ, प्रा. एन. एच. फापाळे व प्रा. बी. आर. साळवे यांच्या कल्पकतेतून साकार झालेले,तत्त्ववेते - जीवन आणि तत्त्वज्ञान अशा १०१ तत्त्ववेत्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा संक्षिप्त परिचय करुन देणारे प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन डॉ. सु. शि. बारलिंगे यांच्या शुभहस्ते झाले. या अधिवेशनात प्राचार्य शिवाजीराव भोसले, दैनिक लोकसत्तांचे संपादक माधव गडकरी यांची जाहीर व्याख्याने गाजली. पेटलाद बडोदा येथील स्वामीजी सच्चिदानंदजी महाराज यांचे सर्वांसाठी खुले असे प्रवचनही झाले. ह्या अधिवेशनाच्या काळात आपला म. त. प. संस्थेची कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्तांकडून नोंद होऊन ही संस्था कार्यान्वित झाली.या अधिवेशनात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील एकूण ३०० प्रतिनिधींची उपस्थिती नोंदली गेली. याचे श्रेय या महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. के. बी सावंत व तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा. अशोक कोर्डे यांचे होते. याच अधिवेशनात कार्यकारी मंडळाची पहिली निवडणूक झाली व नवीन कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले.

म.त. प. ४ थे अधिवेशन शुक्रवार दि. १९/२/१९८८ ते रविवार दि. २१/२/१९८८ असे तीन दिवस मुंबई विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभागातर्फे कलिना - विद्यानगरी परिसरात जे. पी. नाईक भवनातील सभागृहात आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाचे स्थानिक कार्यवाह म्हणून
म.त. प. चे उपाध्यक्ष डॉ. शि. स. अंतरकर हे होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन टाटा मूलभूत संशोधन केंद्रांचे सुप्रसिध्द वैज्ञानिक व विचारवंत डॉ. उदगावकर यांच्या शुभहस्ते झाले. या उद्‍घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ग. ल. अभ्यंकर होते. या अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - आधुनिक जीवतंत्रज्ञानाच्या संदर्भात नीतिमूल्यांचा विचार
अध्यक्ष - डॉ. बाळ फोंडके
सहभाग १) प्रा. अशोक कोर्डे - ठाणे
२) डॉ. प्रतिभा कामत - कल्याण
३) डॉ. सोहन मोडक - पुणे

दुसरा परिसंवाद - सामान्यविषयक समस्या
अध्यक्ष - प्रा. मे. पुं. रेगे - मुंबई
सहभाग १) प्रा. वृषाली कुलकर्णी - नागपूर
२) प्रा. (सौ.) विमल इंदापूरे - मुंबई
३) प्रा. (श्रीमती) अरुंधती खंडकर - मुंबई
या अधिवेशनात २४ प्रतिनिधींना व्यक्तिगत निबंधवाचन केले. या व्यक्तिगत निबंधवाचनाची दोन्ही सत्रे यशस्वी होऊन त्यावर साधक- बाधक चर्चा झाली. या अधिवेशनात एकूण १२५ प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनापासूनच विद्यार्थी निबंध सादरीकरण सुरु झाले यात आठ विद्यार्थी - विद्यार्थीनींनी आपले निबंध सादर केले. या अधिवेशनाचा परामर्श विशेषांक खंड १०, अंक २, ऑगस्ट १९८८ मध्ये प्रसिध्द झाला.

म.त. प. चे ५ वे अधिवेशन दिनांक २१ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर १९८८ या कालावधीत लातूर येतील गोदावरी कन्या प्रशालेत संपन्न झाले. हे अधिवेशन महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर, देगलूर व पूर्णा येथील महाविद्यालयांच्या तत्त्वज्ञान विभागांच्या संयुक्त विद्यमाने भरविले होते. या अधिवेशनाचे स्थानिक कार्यवाह म्हणून प्रा.(सौ.) माधवी कवि होत्या तर सहकार्यवाह म्हणून प्रा. नागोराव कुंभार होते.स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य एम्‌‍. एस्‌. सीतानगरे होते. या अधिवेशनाचे उद्‌घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मन्मथप्पा लोखंडे आणि राजनाराणलाल लाहोटी उपस्थित होते. महाराष्ट्र तत्त्वज्ञान व अधिवेशनाविषयी माहिती देणारी स्मरणिका या अधिवेशनात प्रकशित झाली. या स्मरणिकेचे प्रकाशन बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मल्लिका अप्पा बिडवे यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनात तीन विषयामव्र परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - विचारवंतांचे समाजातील स्थान
सहभाग १) प्राचार्य (डॉ.) जे. एम. वाघमारे - लातूर
२) प्रा. (डॉ.) मो. प्र.मराठे - पुणे

दुसरा परिसंवाद - शैव - वीरशैव तत्त्वज्ञान
सहभाग श्री. व्ही. जी. सुभदाळे - लातूर
हा परिसंवाद पुन:श्च वारणानगर येथील नवव्या अधिवेशनासाठी ठेवून त्यावर निमंत्रकांनी निबंध सादर केलेले आहेत.

तिसरा परिसंवाद - अहिंसा
सहभाग १) प्रा. (सौ.) नीला अशोक कोर्डे - ठाणे
२) प्रा. डी. एस. चौगले - जयसिंगपूर

या अधिवेशनात तीन विशेष व्याख्याने झाली. १) प्राचार्य शिवाजीराव भोसले (विषय - जीवन, विज्ञान व धर्म) २) डॉ. जे. एस. वाघमारे (विषय - समाजातील विचारवंताचे स्थान) ३) श्री. देविसिंग चौहान (विषय -ऋग्‍वेदाची शास्त्रीय उकल) या अधिवेशनात व्यक्तिगत निबंधवाचनाचेही सत्र झाले. विशेषत: प्रा. नागोराव कुंभार यांनी ‘तत्त्वज्ञानाचे कार्य’ या विषयावर तत्त्वज्ञानाचा उपयोजित अंगाने परामर्श घेतला. त्याचबरोबर विशेष निमंत्रित डॉ. श्री. र. कावळे यांचे ‘नवी जीवनमूल्ये व आजची शिक्षणपध्दती या विषयावर उद्‍बोधनपर व्याख्यान झाले.

मराठवाड्यात प्रथमच भरलेल्या या अधिवेशनात विद्यार्थी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी निबंध स्पर्धा सादरीकरणाचा विषय
"डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ : जीवन आणि तत्त्वज्ञान" असा होता. विविध ठिकाणच्या महाविद्यालयीन स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक व बक्षीस, धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. मृदुला कुलकर्णी हीस मिळाले, तर द्वितीय पारितोषिक कु. मृणालिनी सुंठनुरे व आर. एस. थळकरी यांना मिळाले, तर तृतीय पारितोषिक माढा महाविद्यालयाची विद्यार्थीनी माधवी कुलकर्णी या विद्यार्थीनीस मिळाले. या अधिवेशनातील अनेक निबंध एकत्रिरित्या परामर्श खंड ११, अंक ३, नोव्हेंबर १९८९ मध्ये प्रकाशित झाले आहेत.

म.त. प. चे ६ वे अधिवेशन शनिवार दि.११ नोव्हेंबर ते सोमवार दि.१२ नोव्हेंबर १९८९ रोजी पुणॆ विद्यापीठ तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात संपन्न झाले. या अधिवेशनाचे कार्यकारी सचिव डॉ. शं. रा. तळघट्टी, डॉ. सुभाष भेलके, व डॉ. शरद देशपांडे हे होते. स्वागताध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे हे होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन मा. बाळासाहेब भारदे यांच्या शुभहस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी अमळनेरचे नगराध्यक्ष श्री. रतनलाल पहाडे, हे होते. या अधिवेशनात दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - अव्दैतवेदांताचा विसाव्या शतकातील अन्वयार्थ
अध्यक्ष - प्रा. (डॉ.) ल.ग. चिंचोळकर - नागपूर
सहभाग १) प्रा. श्री. ह. दीक्षित - कोल्हापूर
२) डॉ. बी. आर. जोशी - धुळे
३) डॉ. शरद देशपांडे - पुणे
४) डॉ. सदानंद मोरे - पुणे

दुसरा परिसंवाद - शब्दबोध
अध्यक्ष - डॉ. सुरेंद्र बारलिंगे - पुणे
सहभाग १) डॉ. बळीराम ह. शुक्ल - पुणे
२) प्रा. श्रीपाद भट - पुणे
३) पं. वा. बा. भागवत - पुणे
४) डॉ. आर. सुंदरराजन - पुणे

या अधिवेशनात प्रा. केळशीकर, डॉ. निगळ, डॉ. भेलके, डॉ. अळतेकर, मा. सुचित्रा साठे, श्रीमती हेमा मोरे, डॉ. प्रतिभा कामत, डॉ. खालकर, डॉ. प्रदीप गोखले, प्रा. र. ग. दांडेकर, उमाकांत चिमोटे, प्रमोद चव्हाण, सिध्देश्वर तगवाले यांनी निबंध सादरीकरण करुन या सर्व व्यक्तिगत निबंधावर चर्चा झाली. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी डॉ. शं. रा. तळघट्टी, डॉ. शरद देशपांडे आणि डॉ. ज. वा. जोशी यांचे योगदान लाभले. याशिवाय सांगता समारंभात पंडित नेहरुंचे सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञान या विषयावर मा. श्री. बाळासाहेब भारदे यांचे जाहीर व्याख्यनही झाले. या अधिवेशनाचा अमळनेर परामर्श खंड १२, अंक ४, फेब्रु १९९० मध्ये प्रसिध्द झाला.

म.त. प. चे ७ वे अधिवेशन २६ , २७ व २८ जानेवारी १९९१ या कालावधीत पालघर येथील सोनोपंत दांडेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव डॉ. अ. म. पाध्ये हे होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन प्रा. मे. पुं. रेगे यांच्या शुभहस्ते झाले. तर स्वागताध्यक्ष डॉ. ल. भा. मंत्री हे महाविद्यालयाचे प्राचार्य होते.
या अधिवेशनातील वैशिष्ट्य म्हणजे १९९१ हे वर्ष ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे सप्तशताब्दी वर्ष, महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मृती शताब्दीवर्ष तर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्न्मशताब्दी वर्ष होते. या विचारधरनावर परिसंवादाचे विषय ठरविण्यात आले ते पुढीलप्रमाणे -

पहिला परिसंवाद - ज्ञानेश्वरीचे तत्त्वज्ञान
सहभाग १) डॉ. शि. स. अंतरकर : ज्ञानेश्‍वरीतील अध्यात्मज्ञानाची संकल्पना
२) डॉ. शुभदा जोशी : ज्ञानेश्‍वरीतील जीवनमुक्ती संकल्पना
३) डॉ. शं. रा. तळघट्टी : ज्ञानेश्‍वरीतील मायावाद
४) डॉ. ल. भा. मंत्री : ज्ञानेश्वरी व विश्‍वरुपदर्शन योग

दुसरा परिसंवाद - महात्मा फुले व बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान
सहभाग १) डॉ. सदानंद मोरे - महात्मा फुले यांचे सामाजिक तत्त्वज्ञान
२) प्रा. रघुनाथ हिरवे - डॉ. आंबेडकरांचे धम्मविषयक तत्त्वज्ञान
३) प्रा. ज. रा. दाभोळे - म. फुले व डॉ. आंबेडकर विचारांचा परस्परसंबध

या अधिवेशनात डॉ. जावडेकर यांचे ईश्‍वरवाद व डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे ज्ञानेश्वरांची जीवनदृष्टी या विषयांवर विशेष व्याख्याने झाली. या अधिवेशनात वैयक्तिक निबंधवाचनाचे सत्रही झाले. परिसंवादातील व वैयक्तिक निबंधातील काही निवडक निबंध परामर्श - तत्त्वचिंतक ज्ञानेश्वर विशेषांक खंड १३, अंक १ मे १९९३ आणि परामर्श खंड १३, अंक २ नोव्हेंबर १९९३ मध्ये प्रसिध्द केले गेले आहेत. या अधिवेशनात सादर
झालेल्या परिसंवादातील विषय हा त्या वर्षातील तत्त्ववेत्त्यांच्या स्मृतींना व विचारांना उजाळा देणारे ठरले.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ८ वे अधिवेशन २८, २९ फेब्रुवारी व मार्च १९९२ रोजी अहमदनगर येथील न्यू आर्टस्‌, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमध्ये संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक कार्यवाह प्रा. ई. पी. डोंगरे, तर सहकार्यवाह डॉ. मोहन देशमुख होते. स्वागताध्यक्ष हे या महाविद्यालयातील प्राचार्य श्री. के. एच. शितोळे होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या संस्थेचे अध्वर्यू व पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरु मा. डॉ. मोहनरावजी हापसे हे होते. या अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद होऊन त्यावर चर्चा व प्रश्‍नोतर झाली.

पहिला परिसंवाद - राजर्षी शाहू महाराजांचे विचार दर्शन
सहभाग १) डॉ. व्ही. बी. घुगे - औरंगाबाद
२) डॉ. अशोक चौसाळकर - कोल्हापूर
३) प्राचार्य के. एच. शितोळे - अहमदनगर
४) प्रा. सुरेंद्र दरेकर - अहमदनगर
५) प्रा. सुरेंद्र जोंधळे - पुणे

दुसरा परिसंवाद - जैन तत्त्वज्ञानातील नीतिमीमांसा
सहभाग १) डॉ. भागचंद जैन - नागपूर
२) डॉ. एस. एम. शहा - पुणे
३) डॉ. ए. बी. दिगे - वारणानगर
४) डॉ. विलास संगवे - कोल्हापूर
५) प्रा. पी.बी. चौगुले - कराड

वरील दोन्ही परिसंवादातील काही निवडक निबंध परामर्श खंड १४, अंक ४, (फेब्रुवारी १९९३) मध्ये प्रसिध्द केले गेलेले आहेत. या अधिवेशनात व्यक्तिगत निबंधवाचनाचे सत्र यशस्वीरित्या पार पडले. त्यावर चर्चाही झाली. याशिवाय विविध महाविद्यालयातून परिषदेला आलेल्या विद्यार्थ्यांनी निबंध सादर केले. त्यातील परीक्षकांनी निबंध सादरीकरण स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय देण्यात आली.अहमदनगर अधिवेशन विशेषांक परामर्श खंड १४, अंक ४, फेब्रु. १९९३ मध्ये प्रसिध्द झाले. .

म.त. प. चे ९ वे अधिवेशन १२, १३ व १४ नोव्हेंबर १९९२ रोजी वारणानगर येथील वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या यंशवतराव महाविद्यालयात संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक कार्यवाह म्हणून या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. दिगे हे होते. स्वागताध्यक्ष म्हणून मा. विलासरावजी कोरे होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन वारणा उद्योग आणि शिक्षण समुहाचे शिल्पकार मा. श्री. तात्यासाहेब कोरे यांच्या शुभहस्ते
झाले.
या अधिवेशनातील परिसंवादाचे विषय पुढीलप्रमाणे होते.

पहिला परिसंवाद - भारतीय लोकशाहीच्या संदर्भात धर्मनिरपेक्षतावाद
सहभाग १) डॉ. अशोक चौसाळकर - कोल्हापूर
२) डॉ. बी. आर. जोशी - धुळे
३) डॉ. जी. आ. नाईक - कोल्हापूर
४) श्री. वसंत पळशीकर - वाई
५) प्रा. (श्रीमती) अरुंधती खंडकर - मुंबई

या परिसंवादात सादर केले गेलेले निबंध परामर्श खंड १४, अंक ४, (फेब्रुवारी १९९३) यामध्ये प्रसिध्द झाले आहेत.

दुसरा परिसंवाद - शैव व वीरशैव तत्त्वज्ञान
सहभाग १) श्री. सिध्देश्‍वर स्वामी - विजापूर
२) डॉ. सदानंद मोरे - पुणे
३) श्री. गुरु नंदिकेश्‍वर शिवाचार्य - पूर्णा (नांदेड)
४) प्रा. (सौ.) शर्मिला वरिकार - मुंबई
५) डॉ. सुधाकर मोगलेवार - नागपूर

या अधिवेशनात व्यक्तिगत निबंधवाचनाची दोन सत्रे झाली.व्यक्तिगत निबंधसादरीकरणात प्रा. विजय बाणकर, डॉ. निगळ, डॉ. मुकुंद दातार, डॉ. प्रदीप गोखले, डॉ.आर. बी. दामले, प्रा. रागिणी सरदेशमुख, डॉ. मोहन देशमुख, प्रा. पुरंदर चौगुले, डॉ. सिध्देश्‍वर तगवाले, प्रा. श्रीनिवास हेमाडे, प्रा. गुंजवटे, प्रा.ई.पी. डोंगरे व प्रा. जावळे यांनी सहभाग घेतला. दुसर्‍या परिसंवादातील व व्यक्तिगत निबंधातील काही निवडक निबंध परामर्श खंड १५, अंक ४, (फेब्रुवारी १९९४) यामध्ये प्रसिध्द झाले आहेत.
विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धाही शेवटच्या सत्रात झाली. विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धेतील प्रमुख विषय पुढीलप्रमाणे होते.

१) पाश्‍चात्य तत्त्वज्ञानातील प्रत्यक्ष विषयक समस्या.
२) भारतीय दर्शनातील प्रामाण्यवाद

या निबंधस्पर्धेत कु. स्वाती निगळ ह्या विद्यार्थिनीस प्रथम पारितोषिक व बक्षीस मिळाले. दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिकि व बक्षीस विभागून देण्यात आले, ते भिवंडी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. पूनम भानुशाली हीस आणि कु. बसवेश्वर चेणगे ह्या विद्यार्थ्यास होय. या अधिवेशनात सुमारे १०० प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदविली.

म. त. प. चे १० वे अधिवेशन २९, ३० व ३१ मे १९९४ रोजी पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील शंकरराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाले. पूना फिलॉसॉफी युनियनचे सुवर्णजयंती महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, हे अधिवेशन पूना फिलॉसॉफी युनियन पुणे आणि स. प.
महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले गेले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव पूना फिलॉसॉफी युनियनचे अध्यक्ष डॉ. श्री. व्यं. बोकील आणि स. प. महाविद्यालयाचे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा. विजय कारेकर, हे होते. स्वागताध्यक्ष म्हणून स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ह. श्री. साने होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्रीधर गुप्ते यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्री. वा. सोहनी उपस्थित होते. या अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - बौध्दन्याय
सहभाग १) डॉ. बळीराम शुक्ल - पुणे
२) डॉ. मीनल कातरणीकर - मुंबई
३) डॉ. प्रदीप गोखले - पुणे
या परिसंवादात सादर केले गेलेले निबंध परामर्श खंड १६, अंक, ४ (फेब्रुवारी १९९५) मध्ये प्रसिध्द झाले.

दुसरा परिसंवाद - सद्य: स्थितीत तत्त्ववेत्त्यांचे दायित्व
सहभाग १) डॉ. शि. स. अंतरकर - मुंबई
२) डॉ. श्री. व्यं. बोकील - पुणे
३) प्रा. विजय कारेकर - पुणे
४) डॉ. उषा गडकरी - नागपूर
५) डॉ. गोपाळ गुरु - पुणे
६) डॉ. कुमार सप्तर्षी - कोल्हापूर

या अधिवेशनात व्यक्तिगत निबंधवाचनाची दोन सत्रे झाली. वरील दुस‍र्‍या परिसंवादातील निवडक निबंध आणि काही व्यक्तिगत निबंध पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने प्रकाशित होणार्‍या परामर्श या त्रैमासिकात फेब्रुवारी १९९५, खंड १७, अंक १ यामध्ये प्रसिध्द झालेले आहेत.
पूना फिलॉसॉफी युनियनचे सुर्वणजयंती महोत्सवी वर्षाचे औचित साधून या अधिवेशनाच्या निमंत्रकानी परिसंवादातील आणि व्यक्तिगत निबंधाची एक सारांश प्रा. विजय कारेकर होते.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद दशवर्षपूर्तीच्या निमित्ताने एक स्मरणिका प्रसिध्द करण्यात आली. या स्मरणिकेत म. त. प. चे स्थापना अधिवेशन (१९८२) ते दहावे अधिवेशन (१९९४) पर्यंतच्या परिषदेने केलेल्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. या स्मरणिकेसाठी "मराठीतील तत्त्वज्ञानाची सद्य: स्थिती व महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेकडून अपेक्षा" या विषयावर विविध ज्ञान शाखांच्या अभ्यासकांकडून टिपणे मागविली होती. डॉ. शि. अंतरकर व प्रा. श्रीनिवास दीक्षित यांनी संपादित केलेल्या या स्मरणिकेत ही टिपणे प्रसिध्द झालेली आहेत. त्यांनी केलेल्या आवाहनाला पुढील लेखकांचा मिळालेला प्रतिसाद हा बहुमोलाचा होतो.

१) भा. प. बहिरट (पुणे) - मौलिक संकल्पना व बहुजन समाज यातील दरी बुजविण्याचे कार्य तत्त्वज्ञान परिषदेने करावे.
२) प्रा. दि. य. देशपांडे (नागपूर) - अतिशय शोचनीय स्थिती
३) श्री. वसंत पळशीकर (वाई) - तत्त्वज्ञान परिषदेकडून अपेक्षा
४) प्रा. मे. पुं. रेग (मुंबई) - सुधारणा करण्याचा एक व्यवहार्य मार्ग
५) डॉ. अ. ग. जावडेकर (बडोदा) - एकूण स्थिती बरीच समाधानकारक
६) प्रा. ग. प्र. प्रधान (पुणे) - परिषदेकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत.
७) डॉ. सु. वा. बखले (नागपूर) - महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद - एक संस्मरण
८) डॉ. श्री. व्यं. बोकील (पुणे) - एक प्रदीर्घ प्रवास अंगीकारावा लागेल.

या दशवर्षपूर्ती स्मरणिकेत परिषदेची घटना व २१ मे १९९४ पर्यंत नोंदल्या गेलेल्या आजीव सभासदांची यादी प्रसिध्द केली गेलेली आहे.
म. त. प. चे हे दशवर्षपूर्ती अधिवेशन उत्साहवर्धक वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले.

म. त. प. चे ११ वे अधिवेशन महाराष्ट्राबाहेरील गोवा राज्यातील गोवा विद्यापीठ पणजी येथे दिनांक ६, ७ व ८ मे १९९५ रोजी संपन्न झाले.
हे अधिवेशन गोवा विद्यापीठातील तत्त्वज्ञान व मराठी या दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले गेले. या अधिवेशनाचे स्थानिक कार्यवाह म्हणून तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. ए. व्ही. अफोन्सो आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. कोमरपंत हे होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन गोवा
विद्यापीठाच्या कुलगुरुंनी केले. या अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - पर्यावरणनीती
सहभाग १) डॉ. प्रकाश सोमण - पुणे
२) डॉ. अ. ग. जावडेकर - बडोदे
३) मा. श्रीनिवास हेमाडे - संगमनेर

या परिसंवादातील सादर केले गेलेले निबंध परामर्श खंड १७, अंक ३, (नोव्हेंबर १९९५) यामध्ये प्रसिध्द झाले आहेत.

दुसरा परिसंवाद - सौंदर्यानुभव
सहभाग १) डॉ. सिध्देश्वर तगवाले - पुणे
२) प्रा. गौरी भागवत - पुणे
३) डॉ. अशोक जोशी
४) डॉ. वासुदेव सावंत

दुसर्‍या परिसंवादातील सादर झालेले निबंध परामर्श खंड १८, अंक १,(मे १९९६) यामध्ये प्रसिध्द झाले आहेत.
गोवा अधिवेशनात निबंधवाचनाची दोन सत्रे झाली. यात सादर झालेले व्यक्तिगत निबंध परामर्श खंड १७, अंक ४, फेब्रुवारी १९९६ या अंकात प्रसिध्द झालेले आहेत.

म. त. प. चे १२ वे अधिवेशन २४,२५ व २६ डिसेंबर १९९५ रोजी एस. एस. जी. एम. महाविद्यालय कोपरगाव येथे संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव डॉ, मंगला गुमास्ते (पुरंदरे) ह्या होत्या. या महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. शेटे हे स्वागताध्यक्ष होत. बाराव्या
अधिवेशनाचे उद्‍घाटन औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री. नरेंद्र चपलगावकर यांच्या शुभहस्ते झाले.या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. मे. पुं. रेगे हे होते. या अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - रेने देकार्तचे तत्त्वदर्शन
सहभाग १) डॉ. श्री. व्यं. बोकील - पुणे
२) प्रा. श्री. मा. भावे - पुणे
३) डॉ. शरद देशपांडे - पुणे
४) डॉ. बा. य. देशपांडे - अमरावती
५) प्रा. श्रीनिवास दीक्षित - कोल्हापूर
६) प्रा. (सौ.) प्रतिभा कामत - कल्याण
१९९६ हे वर्ष, आधुनिक पाश्‍चात तत्त्वज्ञानाचा जनक व बुध्दिवादी तत्त्वज्ञ रेने देकार्त या तत्त्ववेत्त्यांचे स्मृति चतुर्थशताब्दी या वर्षाचे औचित समोर ठेवूनच ह्या परिसंवादाचा विषय निवडला गेला.

दुसरा परिसंवाद - संतांच्या तत्त्वज्ञानाचा सामाजिक आशय
सहभाग १) डॉ. शि. स. अंतरकर -मुंबई
२) डॉ. सदानंद मोरे - पुणे
३) डॉ. सा. गे. निगक - ठाणे
४) डॉ. समिता टिल्लू - पुणे

या अधिवेशनात व्यक्तिगत निबंधवाचनात डॉ. सु. वा. बखले, प्रा. श. हि केळशीकर, श्री. अशोक सप्रे, प्रा. मंगला आठल्ये, डॉ. सिध्देश्वर तगवाले व प्रा. हेमाडे यांनी सहभाग घेतला. याशिवाय विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले गेले. उल्लेखनीय बाब म्हणजे या अधिवेशनाची एक स्मरणिका प्रसिध्द करण्यात आली. ‘तत्त्वविमर्श’ असे या स्मरणिकेचे नामाभिधान होते. तत्त्वविमर्श ह्या स्मरणिकेत परिसंवादातील सादर केलेले सर्व निबंध परामर्श खंड १८, अंक २, (ऑगस्ट १९९६) मध्ये प्रसिध्द झाले आहेत.
या अधिवेशनात प्रा. सदानंद मोरे यांचे ‘तुकाराम दर्शन’ या विषयावर तर प्रा. मे. पुं. रेगे यांचे ‘धर्म’ या विषयावर जाहीर व्याख्याने आयोजित केली होती. सदर अधिवेशनाचा समारोप महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी सभापती मा. श्री. बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते झाला.

म. त. प. चे १३ वे अधिवेशन २४ ते ३० नोव्हेंबर १९९६ या कालावधीत महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे संपन्न झाले. या संस्थेने जागतिक तत्त्वज्ञान मेळावा आयोजित केला होता. त्याचाच एक भाग म्हणून म. त. प. चे हे अधिवेशन भरविले गेले. विशेषत:ऑल इंडिया फिलॉसॉफीकल कॉग्रेस, अखिल भारतीय दर्शन परिषद, म. त. प. आणि आफ्रो - एशियन फिलॉसॉफीकल कॉग्रेस अशा चारही संस्थांचे एकाच परिसरात, हे अधिवेशन सुनियोजित व शिस्तबध्द पध्दतीने यशस्वी झाले. प्रा. विश्‍वनाथ कराड आयोजन समितीचे अध्यक्ष होते, तर जागतिक तत्त्वज्ञान परिषदेचे सहअध्यक्ष म्हणून प्रा. एम. ए. पार्थसारथी, तर सल्लागार समितीचे प्रमुख डॉ.सुरेंद्र बारलिंगे होते. या जागतिक
तत्त्वज्ञान परिषदेचे उद्‍घाटन डॉ. दलाई लामा, यांच्या शुभहस्ते झाले, तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. मनोहर जोशी होते. म. त. प. च्या अधिवेशनाचे स्थानिक सचिव म्हणून प्रा. मंगला आठल्ये यांनी काम पाहिले. म. त. प. च्या अधिवेशनात पुढील दोन परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - ज्ञानेश्वरांचे (अनुभवामृतातील) तत्त्वज्ञान
सहभाग १) डॉ. शं. रा. तळघटटी (पुणे) - अमृत अनुभवाचे स्वरुप
२) डॉ. ल. ग. चिंचोळकर (नागपूर) - अनुभवामृतातील ब्रह्मबोधाचे स्वरुप
३) डॉ. ल. भा. मंत्री (पालघर) - अनुभवामृत : एक दृष्टिकोन
४) डॉ. समिता टिल्लू (पुणे) - अनुभवामृतातील वाचाऋण परिहार - परामर्श
५) डॉ. बी. आर. जोशी (पुणे) - दृष्टिसृष्टिवाद - संत ज्ञानेश्‍वर आणि बर्कले
६) डॉ. वासुदेव गिंडे (पुणे) - अनुभवामृतातील तत्त्वज्ञान.

या परिसंवादात सादर झालेले निवडक निबंध परामर्श खंड १८, अंक ४, (फेब्रुवारी १९९७) यामध्ये प्रसिध्द झाले.

दुसरा परिसंवाद - सामाजिक विज्ञानातील स्पष्टीकरण
सहभाग १) डॉ. सु. वा. बखले (नागपूर) - सामाजिक विज्ञानाचे स्पष्टीकरण
२) डॉ. दीप्ती गंगावणे (पुणे) - सामाजिक विज्ञानातील स्पष्टीकरण : एक आकलन
३) प्रा. मंगला आठल्ये (पुणे) - सामाजिक स्पष्टीकरणातील प्रतिरुपांचे स्थान
४) प्रा. अशोक कोर्डे (ठाणे) - वैज्ञानिक स्पष्टीकरणाचे स्वरुप
५) प्रा. श्रीनिवास हेमाडे (संगमनेर) - कार्ल पॉपर यांची मुक्त समाजाची संकल्पना आणि भारतीय.

या परिसंवादात सादर झालेले निवडक निबंध आणि व्यक्तिगत निबंधवचनातील निवडक निबंध परामर्श खंड १९, अंक २, ऑगस्ट ११९७ मध्ये प्रसिध्द झाले आहेत. या अधिवेशनातील इतरही काही व्यक्तिगत निवडक निबंध परामर्श खंड १६, अंक ४, फेब्रुवारी १९९७ च्या अंकातही प्रसिध्द झाले आहेत. हे अधिवेशन प्रामुख्याने जागतिक तत्त्ववेत्त्यांच्या भेटीची आणि त्यांच्या विचारांची एक मेजवानीच देऊन गेले. ‘इन दि. क्केस्ट ऑफ युनिव्हर्सल पीस’ या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. माशलेकर यांच्या शुभहस्ते झाले. एकूण ५०० प्रतिनिधी आलेले होते.

म. त. प. चे १४ वे अधिवेशन ७, ८ व ९ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ व राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय यांच्या संयुक्त सचिव प्रा. ज. रा. दाभोळे होते, तर स्वागताध्यक्ष मा. श्री. माधव प्रसाद गोयंका हे होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. द. ना. धनागरे यांच्य शुभहस्ते झाले. सदर अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - ईश्‍वरवाद - निरीश्‍वरवाद
सहभाग १) प्रा. पी. बी. कुलकर्णी - नागपूर
२) डॉ. बळीराम ह.शुक्ल - पुणे
३) डॉ. अ.ग. जावडेकर - बडोदे
४) डॉ. प्रदीप गोखले - पुणे
५) प्रा. श्रीनिवास ह. दीक्षित - कोल्हापूर

दुसरा परिसंवाद - शैक्षणिक परिवर्तनाचा कार्यक्रम
सहभाग १) प्रा. श्री. मा. भावे - पुणे
२) डॉ. श्री. व्यं. बोकील - पुणे
३) प्रा. ज. रा. दाभोळे - कोल्हापूर
४) डॉ. उषा गडकरी - नागपूर

या अधिवेशनातील दोन्ही परिसंवादातील निबंध आणि व्यक्तिगत निबंधाचे सारांश ‘तत्त्वविमर्श’ या पुस्तिकेत प्रसिध्द झालेले आहेत. याशिवाय कोल्हापूर अधिवेशनाचे दोन परामर्श विशेषांकही प्रसिध्द झाले. पहिला विशेषांक खंड २०, अंक - १ ( मे- १९९८) आणि दुसरा विशेषांक खंड २०,
अंक - २ (ऑगस्ट - १९९८) . शेवटच्या सत्रातील या अधिवेशनात विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धाही झाली. या त्रैदिवसीय अधिवेशनात संध्याकाळी प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ. सदानंद मोरे व डॉ. शि. स. अंतरकर यांची कोल्हापूर मधील शहरी नागरिकांसाठी जाहीर व्याख्याने झाली.

म. त. प. चे १५ वे अधिवेशन हडपसर - पुणे येथे २५, २६ व २७ ऑक्टोबर १९९८ या कालावधीत रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व
वाणिज्य महाविद्यालयात संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव प्राचार्य आर. जी. पाटील, तर सहसचिव मा. श्री. दिलीप तुपे होते.
स्वागताध्यक्ष म्हणून खासदार मा. श्री. विठठलरावजी तुपे पाटील होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मा. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर यांनी भूषविले. पुढील दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - समतेची संकल्पना व विषमतेची समस्या
अध्यक्ष - प्राचार्य एन. डी. पाटील
सहभाग १) डॉ. सु. वा. बखले - नागपूर
२) मा. श्री. गोपाळ राणे - आर्थिक विकासाचे तत्त्वज्ञान
३) डॉ. प्रतिभा कामत - कल्याण

दुसरा परिसंवाद - अस्तित्ववाद
अध्यक्ष - प्रा. मे. पुं. रेगे
सहभाग १) डॉ. बी. आर. जोशी - पुणे
२) प्रा. अनिकेत जावरे
३) प्रा. शर्मिला जयंत वीरकर - मुंबई

वरील दुसर्‍या परिसंवादात सादर झालेले निबंध परामर्श (अस्तित्ववाद - विशेषांक) खंड - २१, अंक ३, नोव्हेंबर १९९९ यामध्ये प्रसिध्द झाले.
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेतर्फे कै. सौ. पार्वतीबाई विश्‍वनाथ ओक व डॉ. तारामती विश्‍वनाथ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धेचे विषय दोन होते. १) तत्त्वज्ञानाचे जीवनातील स्थान व २) लोकशाहीमध्ये नीतिमूल्यांचे स्थान.
याशिवाय व्यक्तिगत निबंधवाचनाचे सत्रही झाले. या सत्रातील काही निवडक व्यक्तिगत निबंध परामर्श खंड २१, अंक २, ऑगस्ट १९९९ यात प्रसिध्द झाले.
या अधिवेशनात मा. मोहन धारिया यांचे भारतीय स्वातंत्र्याची ५० वर्षे या विषयावर जाहीर व्याख्यान झाले. या अधिवेनाचा सांगता समारंभ श्री. रामभाऊ तुपे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख पाहुणे श्री. शं. बा. चांदेकर, शिक्षण सह- संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला.

म. त. प. चे १६ वे अधिवेशन १९,२० व २१ नोव्हेंबर १९९९ या कालावधीत अमळनेर येथील प्रताप कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव प्रा. डी. डी. पाटील होते. स्वागताध्यक्ष म्हणून मा. प्राचार्य डॉ. अ. नी. माळी हे होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री व शिक्षणमंत्री आणि विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्री. मधुकररावजी चौधरी यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख पाहुणे डॉ. एस. एफ . पाटील कुलगुरु उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे उपस्थित होते. या अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - डेव्हिड ह्युमचे तत्त्वज्ञान
अध्यक्ष - डॉ. शि. स. अंतरकर - मुंबई
सहभाग १) डॉ. साहेबराव निगळ - ह्युमचे धर्माविषयक चिंतन
२) डॉ. डी. डी. बंदिष्टे - ह्युमच्या संशयवादाचे परीक्षण
३) डॉ. श्री. व्यं. बोकी - ह्युमचे तत्त्वज्ञान
४) डॉ. सुभाष देसाई - डर्किनची सामाजिक एकतेमागची कारणमीमांसा

दुसरा परिसंवाद - साने गुरुजींचे जीवनचिंतन
सहभाग १) डॉ. विश्वासराव पाटील - शहादा
२) प्रा. (डॉ.) किसन पाटील - जळगाव
३) प्रा. ज. रा. दाभोळे - कोल्हापूर

या अधिवेशनात व्यक्तिगत निबंधवाचनात प्रा. वीरकर, श्री. कदम बाबा, प्राचार्य बंड, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. बी. आर दोशी इ. नी सहभाग घेतला. विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धा आयोजित केली. त्यात दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे विषय:
१) मानवी जीवनात श्रध्देची गरज आहे काय ?
२) माहिती तंत्रज्ञानापुढे जग जवळ आले; पण माणसे दूर गेली का ?
या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी माजी खासदार डॉ. वाय. एस. महाजन, तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एन. के. ठाकरे उपस्थित होते.

म. त. प. चे १७ वे अधिवेशन ३१ ऑक्टोबर व १ आणि २ नोव्हेंबर २००० या कालावधीत वाई येथील किसनवीर महाविद्यालयात संपन्न झाले. प्राज्ञ पाठशाळा मंडळ, वाई आणि किसनवीर महाविद्यालय, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन आयोजित केलेले होते. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव प्रा. यशवंत कळमकर आणि स्वागताध्यक्ष मा. श्री. प्रतापराव भोसले होते. अधिवेशनाचे उद्‍घाटन प्रमुख अतिथी प्रा. देवदत्त दाभोलकर यांच्या शुभहस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा. राम बापट होते. सदर अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद संपन्न झाले.

पहिला परिसंवाद - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे धर्मचिंतन
अध्यक्ष - प्रा. मे. पुं. रेगे - वाई
सहभाग १) डॉ. शि. स. अंतरकर - मुंबई
२) डॉ. शं. रा. तळघटटी - पुणे
३) डॉ. अशोक चौसाळकर - कोल्हापूर

दुसरा परिसंवाद - भारतीय राज्यघटनेतील मूल्यव्यवस्था
अध्यक्ष - प्रा. राम बापट - पुणे
सहभाग १) डॉ. सत्यरंजन साठे
२) श्री. अविनाश धर्माधिकारी - पुणे
३) डॉ. ज. रा. दाभोळे - कोल्हापूर
४) डॉ. बी. आर. जोशी - पुणे

या अधिवेशनात व्यक्तिगत निबंध सादरीकरणाचे सत्रही झाले. याशिवाय विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धा झाली.
त्यासाठी पुढील तीन विषय ठेवले होते.

१) भ्रष्टाचार निर्मूलनाचे मार्ग
२) तत्त्वज्ञानाकडून माझ्या अपेक्षा
३) भारतीय राज्यघटना व राष्ट्रीय एकात्मता.

वरील दोन्ही परिसंवादात सादर केले गेलेले सर्व निबंध आणि व्यक्तिगत निबंधातील काही निवडक निबंध ‘परामर्श’ वाई विशेषांक १७ वे अधिवेशन, खंड २३, अंक १, जुलै २००१ या अंकात प्रसिध्द झाले आहेत.

म. त. प. चे १८ वे अधिवेशन नागपूर येथे नागपूर विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या विद्यमाने दिनांक ३,४ व ५ नोव्हेंबर २००१ रोजी संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव डॉ. सुनीती देव व सहसचिव प्रा. एस.डब्ल्यू. गायधने होते. १८ व्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. पी. बी. कुलकर्णी होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. मधुकर रोडे यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. रा. जोशी. उपस्थित होते. या अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद यशस्वी झाले.

पहिला परिसंवाद - संत गुलाबराव महाराज
अध्यक्ष - डॉ. पंकज चांदे - कुलगुरु कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक
सहभाग १) प्रा. लीना रस्तोगी - नागपूर
२) मा. श्री. श्री. मा. घटाटे - नागपूर
३) डॉ. सा. गे. निगळ - ठाणे
४) सौ. शिवानी सोमलवार - नागपूर
५) डॉ. समिता टिल्लू - पुणे
६) डॉ. वि. भा. महाजनी - नागपूर

दुसरा परिसंवाद - कांटचे तत्त्वज्ञान
अध्यक्ष - डॉ. श्री. व्यं. बोकील - माजी प्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज, पुणे.
सहभाग १) डॉ. जे. जे. महाजन - नागपूर
२) डॉ. प्रतिभा कामत - कल्याण
३) प्रा. शर्मिला ज. वीरकर - मुंबई
४) डॉ. क्रांतिप्रभा पांडे - नागपूर
५) डॉ. वृषाली कुलकर्णी - नागपूर
६) डॉ. प्रकाश सोमण - पुणे

कांटच्या तत्त्वज्ञानावरील परिसंवादात सादर झालेले निबंध परामर्श ( इमान्युल काण्ट विशेषांक) खंड २५, अंक ३-४ नोव्हेंबर २००३ ते एप्रिल २००४ या अंकांत प्रसिध्द झाले आहेत.
या अधिवेशनात व्यक्तिगत निबंधवाचन सत्राशिवाय विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धाही पुढील विषयावर झाली.
१) जागतिकीकरणामुळे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे काय ?
२) भारताला नवप्रबोधनाची आवश्यकता आहे काय ?
३) धर्माचे भवितव्य काय ?

प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व बक्षिसे सांगता समारंभात देण्यात आली. या अधिवेशनात प्रा. देविदास द. वाडेकर स्मृती
व्याख्यान वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर येथील माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा. पी. बी. कुलकर्णी यांनी दिले. व्यक्तिगत निबंधवाचन सत्रात प्रा. मे. पुं. रेगे यांची निवडक पत्रे संपा. सुनिती देव या पुस्तकाचा प्रकाशन समारंभही झाला. या अधिवेशनाचा सांगता समारोप नागपूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. मधुकर रोडे यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत तत्त्वज्ञान विभाग प्रमुख, धरमपेठ महाविद्यालय, नागपूर येथील डॉ. उषा गडकरी या होत्या.

म. त. प. चे १९ वे अधिवेशन १७ ते १९ नोव्हेंबर २००२ या कालावधीत मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभाग आणि क. जे. सोमैया भारतीय संस्कृती पीठम्‌ विद्याविहार, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव म्हणून डॉ. शुभदा जोशी आणि डॉ. कला आचार्य होत्या. स्वागताध्यक्षपदी सोमैया विद्याविहार, मुंबई संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. शांतिलाल सोमैया होते. या अधिवेशनाचा उद्‍घाटन
समारंभ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या शुभहस्ते झाला. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी भूषविले. या अधिवेशनात दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद : गेल्या अर्धशतकातील पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञान
सहभाग १) डॉ. ज. रा. दाभोळे - कोल्हापूर
२) डॉ. श्री. व्यं. बोकील - पुणे
३) डॉ. शरद देशपांडे - पुणे
४) डॉ. अर्चना देगावकर - अमळनेर
५) डॉ. दीप्ती गंगावणे - पुणे
६) डॉ. बी. पी. काळे - बार्शी

दुसरा परिसंवाद : श्रमण परंपरेची सद्य: कालीन प्रस्तुतता
सहभाग १) डॉ. शि. स. अंतरकर - मुंबई
२) डॉ. मीनल कातरणीकर - मुंबई
३) डॉ. प्रदीप गोखले - पुणे
४) कमलिनी बोकरीया
५) प्रा. एन. के. रासकर - फलटण
वरील दोन्ही परिसंवादात सादर झालेले निबंध परामर्श खंड २५, अंक १, जुलै २००३ या अंकात प्रसिध्द झालेले आहेत.
व्यक्तिगत निबंध वाचनसत्राशिवाय पुढील विषयांवर विद्यार्थी निबंध सादरीकरणाचे सत्रही यशस्वी झाले.
१) उच्च शिक्षणातील मानव्यविद्यांचे महत्त्व
२) दहशतवादाला तात्त्विक अधिष्ठान आहे काय ?
३) पर्यावरणनीती
अशा प्रकारे या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या निबंध सादरीकरण स्पर्धेतील सहभाग उत्साहवर्धक होता.

म. त. प. चे २० वे अधिवेशन ३१ ऑक्टोबर व १, २ नोव्हेंबर २००३ या कालावधीत फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाच्यावतीने गणेश मंगल कार्यालयात संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव प्रा. एस. एम. पिटके होते. या अधिवेशनाच्या उद्‌घाटनास डॉ. श्री. व्यं. बोकील, अध्यक्ष महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, प्रा. राम बापट, ज्येष्ठ विचारवंत आणि श्री. विजय कुवळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष मा. श्री. बकुळ पराडकर होते. या अधिवेशनाचे स्नेहसंमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. राम बापट होते. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने हे अधिवेशन फलटण येथे आयोजित केलेले होते. सदर अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - महानुभव पंथाचे तत्त्वज्ञान
अध्यक्ष - मा. राम बापट, पुणे
सहभाग १) प्रमिला मा. देशमुख (बार्शी) - महानुभवांचे तत्त्वज्ञान
२) सिन्नरकर बाबा (फलटण) महानुभव पंथातील अवतार परंपरा
३) आसेगावकर प्रकाशमुनी (फलटण) महानुभाव तत्त्वज्ञानातील देवता
४) श्रीधर आकाशकर (पुणे) महानुभावाचा आधारग्रंथ सूत्रपाठ
५) प्रा. एस. के. रासकर (फलटण) महानुभावी ईश्‍वर आणि इतर भारतीय दर्शनातील ईश्‍वर यांचा तुलनात्मक अभ्यास

दुसरा परिसंवाद - उपयोजित नीतिशास्त्र
अध्यक्ष - डॉ. शि. स. अंतरकर - मुंबई
सहभाग १) मंगला आठल्ये - पुणे - शाकाहारवाद
२) रिना दि. पितळे - मुंबई - मानवी क्लोनिंग : एक नैतिक आव्हान
३) डॉ. सुरेंद्र गायधने - नागपूर - करबुडवेपणा आणि नैतिक मुल्ये
४) प्रा. माधवी कवि - लातूर - वैद्यक व्यवसायातील नीती.

या अधिवेशनात डॉ. मेक्सिन बर्नसन यांचे "माझ्या शैक्षणिक कार्याची बैठक" या विषयावर व्याख्यान झाले. याशिवाय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची " माझी विचार यात्रा" या विषयावर दोन खुली व्याख्याने झाली. तसेच प्रा. डॉ. प्र. ना. दीक्षित यांनी ‘तत्त्वज्ञान कशासाठी’ या विषयावर आपले विचार मांडले . ‘तत्त्वविमर्श’ नावाने निबंध सारांश पुस्तिकेचे प्रकाशन झाले. अधिवेशन काळात व्यक्तिगत निबंधवाचनाचे सत्रही झाले. या सत्रात प्रा. संगीता पांडे, प्रा. अर्चना मलिक, डॉ. नागोराव कुंभार, प्रा. वामन पाटील, डॉ. साहेबराव गे. निगळ, प्रा.पुरंदर चौगुले यांनी सहभाग घेतला. याशिवाय विद्यार्थि - निबंध सादरीकरण स्पर्धाही झाली. निबंध सादरीकरण स्पर्धेचे विषय तीन होते.
१) जागतिकीकरण ज्ञानाचे की सत्तेचे
२) मानव: एक संगणक
३) आंतरधर्मीय सांमजस्य
वरील तीन विषयांवर विविध महाविद्यालयांतील सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धासत्राच्या समारोप प्रसंगी डॉ. सुनीती देव यांनी काही मूलभूत तात्त्विक प्रश्‍न उपस्थित केले. त्यासाठी मानवधर्माची रुपरेषा सुस्पष्ट मांडणे. हे नैतिकदृष्टया आपल्यावर बंधनकारक आहे. याची जाणीव करुन दिली. या अधिवेशनास महाराष्ट्रात शंभरावर तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या अधिवेशनाच समारोप श्रीमंत रघुनाथ राजे नाईक - निंबाळकर यांच्या उपस्थितीत झाला. वरील दोन्ही परिसंवादातील निबंध व व्यक्तिगत निबंध परामर्श (फलटण विशेषांक) खंड २६, अंक २- ३, ऑगस्ट व जानेवारी २००५ यात प्रसिध्द केले गेलेले आहेत.

म. त. प. चे २१ वे अधिवेशन १८,१९ व २० नोव्हेंबर २००४ रोजी शिवळे येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संपन्न झाले.ठाणे जिल्ह्यातील या ग्रामीण व आदिवासी भागाचेही म. त. प. ने निमंत्रण स्वीकारले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव प्रा. सुनील गवरे होते.स्वागताध्यक्षपदी या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य भुजबळ होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन जनसेवा शिक्षण मंडळ या संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार गोटी रामभाऊ पवार यांच्या शुभहस्ते झाले. या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. डी. डी. बंदिष्टे होते. या अधिवेशनात दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - आदिवासी संस्कृती - नैतिक,सौंदर्यशास्त्रीय आणि सामाजिक परिमाणे
अध्यक्ष - मा. श्री. गोविंद गारे
सहभाग १) डॉ. नरेंद्र बोखारे
२) डॉ. डॉ. लता छत्रे - पुणे
३) डॉ. भास्कर गिरधारी - जव्हार
४) डॉ. सुदाम जाधव
५) श्री. बाहरु सोनावणे

दुसरा परिसंवाद - गेल्या अर्धशतकातील भारतीय तत्त्वज्ञान
अध्यक्ष - डॉ. शि. स. अंतरकर - मुंबई
सहभाग १) डॉ. एस. व्ही. बोकील - पुणे
२) डॉ. हेमा मोरे - पुणे
३) प्रा. प्र. ब. कुलकर्णी - नागपूर
४) डॉ. प्रतिभा कामत - कल्याण
५) डॉ. सुभाष भेलके - पुणे

या अधिवेशनात निमंत्रित आयोजकांनी एक स्मरणिका प्रकाशित केली. त्यात परिसंवादातील निबंध आणि व्यक्तिगत निबंधाचे सारांश प्रसिध्द झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बंदिष्टे यांनी तत्त्वज्ञान (ना) हे जगावेगळे का असावे ? का. नसावे ? यावर उद्‌बोधक मार्गदर्शन केले. तसेच या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एम. एस. कुर्‍हाडे यांनी एकविसाव्या शतकातील उच्च शिक्षण या विषयावर जाहीर व्याख्यान दिले. तसेच एका सत्रात विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धा झाली. त्याचे विषय १) शिक्षणाचे प्रयोजन २) वृध्दांचे समाजातील स्थान: नैतिक व सामाजिक प्रश्‍न
३) आण्विक सामर्थ्य व शांतता. या अधिवेशनात सादर केले गेलेले व्यक्तिगत निबंध सारांश रुपाने, तर निबंध संपादित स्वरुपात परामर्शच्या दोन अंकांमधून प्रसिध्द झाले. परामर्श (२१ वे अधिवेशन शिवळे) खंड २७, अंक २, ऑगस्ट - ऑक्टोबर २००५ या विशेषांकात प्रसिध्द झाले.

म. त. प. चे २२ वे अधिवेशन ७, ८ व ९ नोव्हेंबर २००५ या कालावधीत लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयात संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वामन पाटील होते. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मदनलालजी बियाणी स्वागताध्यक्ष होते. या अधिवेशनाचे उद्‍घाटन लातूरचे नगराध्यक्ष व स्वामी रामनंदतीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या शुभहस्ते झाले. त्यांनी या अधिवेशनात सामाजिक न्याय, तत्त्वज्ञ आणि विचारवंत याविषयावर भाषणही केले. या अधिवेशनात पुढील दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद - भारतीय प्रबोधनाचे शिल्पकार स्वामी दयानंद सरस्वती विचार आणि कार्य
सहभाग १) नयनकुमार विशारद
२) प्रा. सुधाकर कुलकर्णी
३) राजलक्ष्मी देशपांडे

दुसरा परिसंवाद - पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानातील न्याय संकल्पनेचा विकास
सहभाग १) डॉ. जनार्दन वाघमारे (लातूर)
२) प्रा. भाऊसाहेब काळे (बार्शी)
३) प्रा. वैजयंती बेलसरे (पुणे)
४) डॉ. ज. रा. दाभोळे (कोल्हापूर)
५) डॉ. श्री. व्यं. बोकील (पुणे)

या अधिवेशनात व्यक्तिगत निबंधवाचनाची दोन सत्रे झाली. या सत्रात डॉ. काळे, डॉ. रणसुभे, डॉ. गायधने, प्रा. अर्चना मलिक, श्रीपाद देशपांडे, डॉ. गोखले प्रा. सुधीर पिटके, प्रा. गौरी भागवत प्रा. शर्मिला वीरकर, डॉ. निगळ, डॉ. कामत, प्रा. वामन पाटील, प्रा. रासकर, प्राचार्य भंडारी, डॉ. नागोराव कुंभार, प्रा. सुनील गवरे, प्रा. निर्मळ, प्रा. बादाडे, प्रा. हाडके प्रा. लोखंडे, श्री. कदम बाबा यांनी सहभाग घेतला. वरिल दोन्ही परिसंवादाचे व व्यक्तिगत निबंधवाचकांचे सर्व निबंध सारांशरुपाने एका स्मरणिकेत प्रसिध्द केले गेलेले आहेत. याशिवाय लातूर अधिवेशनाचा विशेषांक परार्मशद्वारे प्रसिध्द झाला. वरील दोन्ही परिसंवादातील सादर केले गेलेले निबंध परामर्श (२२ वे अधिवेशन लातूर) खंड २८, अंक ३, नोव्हेंबर - २००६ मध्ये प्रसिध्द झाले, तर याच अधिवेशनात सादर झालेल्या व्यक्तिगत निबंधांपैकी काही निवडक निबंध परामर्श खंड २८, अंक ४, फेब्रुवारी - एप्रिल २००७ मध्ये प्रसिध्द झाले आहेत. विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे होते.
१) जैव तंत्रज्ञानाचे मानवी जीवनावरील परिणाम
२) तत्त्वज्ञान म्हणजे काय ?
३) विद्यार्थ्यांचा राजकारणातील सहभाग
वरील विषयांवर विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करुन प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व पारितोषिके यांचे वितरण अधिवेशनाच्या सांगता समारंभात केले. याशिवाय विश्‍वनाथ ओक खुल्या निबंध स्पर्धाही परिषदेने आयोजित करुन त्याचा विषय गुरु नानक: विचार व कार्य असा होता. प्रथम क्रमांकाने येणार्‍या निबंध स्पर्धकाला हे पारितोषिक दिले गेले. तत्त्वज्ञान परिषदेतर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा गोएंका पुरस्कार डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांच्या मी, तुम्ही, धर्म आणि सत्ता या ग्रंथास देण्यात आला.

म. त. प. चे १९ वे अधिवेशन १७ ते १९ नोव्हेंबर २००२ या कालावधीत मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभाग आणि क. जे. सोमैया भारतीय संस्कृती पीठम्‌ विद्याविहार, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव म्हणून डॉ. शुभदा जोशी आणि डॉ. कला आचार्य होत्या. स्वागताध्यक्षपदी सोमैया विद्याविहार, मुंबई संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. शांतिलाल सोमैया होते. या अधिवेशनाचा उद्‍घाटन
समारंभ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या शुभहस्ते झाला. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी भूषविले. या अधिवेशनात दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद : गेल्या अर्धशतकातील पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञान
सहभाग १) डॉ. ज. रा. दाभोळे - कोल्हापूर
२) डॉ. श्री. व्यं. बोकील - पुणे
३) डॉ. शरद देशपांडे - पुणे
४) डॉ. अर्चना देगावकर - अमळनेर
५) डॉ. दीप्ती गंगावणे - पुणे
६) डॉ. बी. पी. काळे - बार्शी

दुसरा परिसंवाद : श्रमण परंपरेची सद्य: कालीन प्रस्तुतता
सहभाग १) डॉ. शि. स. अंतरकर - मुंबई
२) डॉ. मीनल कातरणीकर - मुंबई
३) डॉ. प्रदीप गोखले - पुणे
४) कमलिनी बोकरीया
५) प्रा. एन. के. रासकर - फलटण
वरील दोन्ही परिसंवादात सादर झालेले निबंध परामर्श खंड २५, अंक १, जुलै २००३ या अंकात प्रसिध्द झालेले आहेत.
व्यक्तिगत निबंध वाचनसत्राशिवाय पुढील विषयांवर विद्यार्थी निबंध सादरीकरणाचे सत्रही यशस्वी झाले.
१) उच्च शिक्षणातील मानव्यविद्यांचे महत्त्व
२) दहशतवादाला तात्त्विक अधिष्ठान आहे काय ?
३) पर्यावरणनीती
अशा प्रकारे या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या निबंध सादरीकरण स्पर्धेतील सहभाग उत्साहवर्धक होता.

म. त. प. चे १९ वे अधिवेशन १७ ते १९ नोव्हेंबर २००२ या कालावधीत मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभाग आणि क. जे. सोमैया भारतीय संस्कृती पीठम्‌ विद्याविहार, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव म्हणून डॉ. शुभदा जोशी आणि डॉ. कला आचार्य होत्या. स्वागताध्यक्षपदी सोमैया विद्याविहार, मुंबई संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. शांतिलाल सोमैया होते. या अधिवेशनाचा उद्‍घाटन
समारंभ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या शुभहस्ते झाला. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी भूषविले. या अधिवेशनात दोन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद : गेल्या अर्धशतकातील पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञान
सहभाग १) डॉ. ज. रा. दाभोळे - कोल्हापूर
२) डॉ. श्री. व्यं. बोकील - पुणे
३) डॉ. शरद देशपांडे - पुणे
४) डॉ. अर्चना देगावकर - अमळनेर
५) डॉ. दीप्ती गंगावणे - पुणे
६) डॉ. बी. पी. काळे - बार्शी

दुसरा परिसंवाद : श्रमण परंपरेची सद्य: कालीन प्रस्तुतता
सहभाग १) डॉ. शि. स. अंतरकर - मुंबई
२) डॉ. मीनल कातरणीकर - मुंबई
३) डॉ. प्रदीप गोखले - पुणे
४) कमलिनी बोकरीया
५) प्रा. एन. के. रासकर - फलटण
वरील दोन्ही परिसंवादात सादर झालेले निबंध परामर्श खंड २५, अंक १, जुलै २००३ या अंकात प्रसिध्द झालेले आहेत.
व्यक्तिगत निबंध वाचनसत्राशिवाय पुढील विषयांवर विद्यार्थी निबंध सादरीकरणाचे सत्रही यशस्वी झाले.
१) उच्च शिक्षणातील मानव्यविद्यांचे महत्त्व
२) दहशतवादाला तात्त्विक अधिष्ठान आहे काय ?
३) पर्यावरणनीती
अशा प्रकारे या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या निबंध सादरीकरण स्पर्धेतील सहभाग उत्साहवर्धक होता.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे २५ वे रौप्य महोत्सवी अधिवेशन ६, ७ व ८ नोव्हेंबर २००८ या कालावधीत कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ, राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय आणि जस्ट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुसंपन्न होत आहे. या अधिवेशनाचे स्थानिक सचिव प्रा.सायरा
मुलानी व समन्वयक म. त. प. चे सह - कार्याध्यक्ष डॉ. ज. रा. दाभोळे आहेत. या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ तत्त्वचिंतक डॉ. रावसाहेब कसबे आहेत. या अधिवेशनाचे उद्‍घाटन न्या. बी. जी. कोळसे - पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. या अधिवेशनात दोन परिसंवाद
आयोजित केले आहेत.
१) विद्रोहाचे तत्त्वज्ञान
२) तत्त्वज्ञानाच्या पद्धती
विद्यार्थी निबंध सादरीकरण स्पर्धेचा विषय - मला भावलेला तत्त्वज्ञ

वक्तृत्व स्पर्धेचा विषय
१) विज्ञान युगात तत्त्वज्ञानाची गरज काय ?
२) धर्माची गरजच काय ?
३) जागतिकीकण : शाप की वरदान ?
याशिवाय म. त. प. तर्फे कै. विश्वनाथ विनायक ओक खुल्या निबंधस्पर्धेचे आयोजन केलेले असून त्याचा विषय "तुकाराम - गाथेतून व्यक्त होणारा तात्त्विक विचार" असा आहे. हे रौप्य महोत्सवी अधिवेशन सुसंपन्न होत आहे. ही म. त. प. ची २५ वर्षाची वाटचाल प्रगल्भ विचाराकडे झेपावणारी आहे.
अशा रितीने महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेची आजपर्यंतची चोविस अधिवेशने महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यात सुसंपन्न झाली. या विविध अधिवेशनांना तत्त्वज्ञानाच्या ज्येष्ठ प्राध्यापकांनी आणि विविध क्षेत्रातील ज्येष्ठ विचारवंतानी आपल्या विचाराचे मौलिक योगदान दिले. तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसेच तत्त्वज्ञान प्रेमींनी या अधिवेशनांना दिलेला सहयोग असाच वृद्धिंगत होत राहावा. ‘तत्त्वज्ञान’ ह्या विषयाचा जिवंतपणा परिषदेच्या रुपाने बहरत जावो. आपल्या विचारांची देवाणघेवाण शोधनिबंधाच्या रुपाने परिषदेत होणे यासाठी ही संघटना कार्यरत आहे. म. त. प. ही संस्था मजबूत होणे ही काळाची गरज आहे. तिला अधिक गतिमान करण्याची जबाबदारी तत्त्वज्ञानाच्या तरुण व उत्साही प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची आहे. यासाठी परिषदेला आर्थिक पाठबळ देऊन ही संस्था पुढे नेण्यास आपले योगदान
द्यावे, हीच रौप्यमहोत्सवी वर्षाची विनम्र प्रार्थना.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे २८ वे अधिवेशन ५,६,७ जानेवारी २०१२ या कालावधीत पारनेर येथे पुर्णवाद शिक्षण प्रसारक मंडळ पारनेर आणि न्यु आर्टस, कॉमर्स एन सायन्स कॉलेज पारनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाले.या अधिवेशनाचे स्थानिक सचिव एस. एम.अबोटी होते तर प्रा. शिवाजीराव देवडे स्वागताध्यक्ष होते.

परिषदेचा उद्‍घाटनसमारंभ प.पु.वि.रा.पारनेरकर यांच्या शुभहस्ते झाला.या अधिवेशनाचे अध्यक्षपद डॉ.सुभाषचंद्र भेलके, तत्वज्ञान विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठ यांनी भुषविले.

या अधिवेशनात स्वातंत्र्य संकल्पनेचा तात्विक अर्थ आणि पूर्णवादी तत्वज्ञान या दोन विषयावर परिसंवाद झाले. डॉ. दाभोळे,. डॉ. प्रदीप गोखले, डॉ. मोहनराव देशमुख हे पहिल्या परिसंवादात होते तर पूर्णवादी तत्वज्ञान या विषयावर. डॉ. उदय कुमठेकर, डॉ. लता छ्त्रे, डॉ. वैजयंती बेलसरे, डॉ. हेमलता मोरे सहभगी झाले होते.

विद्यार्थ्यांसाठी निबंध सादरीकरण स्पर्धा, वक्त्रूत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. व्यक्तिगत निबंधाची एकाच वेळेस दोन ठिकाणी तीन सत्रे पार पडली.समारोप प्रसंगी मा.श्री. पोपटराव पवार सरपंच(आदर्श गाव) हिवरे बाजार जि. अहमदनगर हे होते.

जळगाव येथील के.सी.ई. सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय याला विशेष गुणवत्ता (College of Excellence) म्हणुन गौरविले आहे अश्या ह्या प्रशस्त इमारती, भव्य परिसर असलेल्या महाविद्यालयात महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे २९ वे अधिवेशन २२,२३,२४ नोव्हें.२०१२ या कालावधीत संपन्न झाले. प्रा.अनिल राव हे स्वागताध्यक्ष होते तर प्रा.व्हि.एस.कंची स्थानिक सचिव आणि डॉ. रजनी सिन्हा स्थानिक महासचिव होत्या. परिषदेच्या उद्‍घाटनसमारंभाला डॉ. डी.एन.तिवारी, तत्वज्ञान विभाग प्रमुख, बनारस हिंदु विश्वविद्यालय प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते तर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. नंदकुमार बेडंखळे हे अध्यक्षस्थानी होते.

अधिवेशनात अकैत वेदान्त- एक चिकीत्सा आणि उत्तर आधुनिकतावाद या विषयावर परिसंवाद झाले.

या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणुन डॉ. ई.रा. तळघट्टी,पुणे, तत्वज्ञान विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक हे लाभले होते.व्यक्तिगत निबंधाची एकाच वेळेस दोन ठिकाणी तीन सत्रे पार पडली.तर विद्यार्थ्यांसाठी निबंध सादरीकरण स्पर्धा, वक्त्रूत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्रा.अनिल राव यांच्या हस्ते समारोपाचा समारंभ पार पडला.

कला, वाणिज्य न विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ३० वे अधिवेशन ६,७ व ८ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत संपन्न झाले.